ETV Bharat / lifestyle

अ‌ॅपलचे जगातील पहिले पाण्यातील तरंगते रिटेल स्टोअर 'या' देशात होणार सुरू - Latest Apple news

सिंगापूरमधील अ‌ॅपलचे स्टोअर हे लोकांसाठी लवकरच खुले होणार आहे. हे स्टोअर म्हणजे नवनिर्मितीचे ह्रदय असलेल्या ठिकाणी असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अॅपलचे तरंगते स्टोअर
अॅपलचे तरंगते स्टोअर
author img

By

Published : Aug 26, 2020, 5:19 PM IST

Updated : Aug 26, 2020, 5:55 PM IST

सिंगापूर - कोरोनाच्या महामारीत पुरवठा साखळी विस्कळित झाली असतानाही अ‌ॅपल कंपनी सिंगापूरमध्ये नवे रिटेल स्टोअर सुरू करणार आहे. विशेष म्हणजे हे रिटेल स्टोअर सिंगापूरच्या समुद्राच्या खाडीत पाण्यावर असणार आहे.

सिंगापूरमधील अ‌ॅपलचे स्टोअर हे लोकांसाठी लवकरच खुले होणार आहे. हे स्टोअर म्हणजे नवनिर्मितीचे ह्रदय असेल्या ठिकाणी असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या ठिकाणी तुम्हा नव्या कल्पना आणि पॅशनचे क्षण टिपता येणार आहेत, असे अ‌ॅपलने एका वेबपेजवर म्हटले आहे. कंपनीने म्हटले की, तुम्हाला अधिक विस्तार करण्यासाठी, संपर्क वाढविण्यासाठी आणि नवीन काहीतरी करण्यासाठी ही जागा आहे. तुमची कल्पना तुम्हाला कुठे नेईल, हे याची आम्ही वाट पाहू शकत नाही.

अ‌ॅपलने सिंगापूरमधील ऑर्किड रोडवरील नाईडब्रिज इमारतीत २०१७ मध्ये पहिले स्टोअर सुरू केले होते. हे दक्षिण आशियातील कंपनीचे पहिले स्टोअर आहे. तर दुसरे स्टोअर गेल्या वर्षी ज्वेल छांगी विमानतळावर सुरू केले आहे. दरम्यान, समुद्राच्या खाडीतील अ‌ॅपलचे स्टोअर हे जगातील ५१२ वे स्टोअर आहे.

दरम्यान, नुकतेच अ‌ॅपल ही जगातील सर्वाधिक भांडवली मूल्य असलेली कंपनी ठरली आहे.

Last Updated : Aug 26, 2020, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.