नवी दिल्ली - एमआय इंडियाचा एमआय 11 अल्ट्रा भारतात 7 जुलैला दुपारी 12 नंतर ग्राहकांकरिता उपलब्ध होणार आहे. ही माहिती एमआय इंडियाने दिली आहे.
एमआय 11 अल्ट्राची 69,990 रुपये किंमत आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे या स्मार्टफोनचे लाँचिंग होण्यास उशीर झाला आहे. ग्राहकांना एमआय डॉट कॉमवरून अल्ट्रा गिफ्ट कार्ड हे 1,999 रुपयांना खरेदी करावे लागणार आहे. ही रक्कम एमआय अल्ट्राच्या खरेदीनंतर परत मिळणार आहे. त्यासोबत ग्राहकांना बोनस आणि दोन वेळा मोफत स्क्रीन बदलून मिळणार आहे.
हेही वाचा-जिओचा डाटा संपल्यानंतरही मिळू शकते सेवा; 'हा' निवडा पर्याय
ही आहेत स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
- ट्रिपल प्रो ग्रेड प्रायमरी सेटअप ((50MP+48MP+48MP), कस्टम मेड जीएन२ कॅमेरा सेन्सर, ड्यूल पिक्सेल प्रो टेक्नॉलॉजी आणि इतर फीचर सुपरफोन आहेत.
- या सुपरफोनमुळे डीएसएलआर हा पॉकेटमध्ये असल्याचा अनुभव मिळेल, असा एमआय इंडियाचा दावा आहे. ए
- मआय 11 अल्ट्रामध्ये क्वालकोम्न स्नॅपड्रॅगन 888 मोबाईल चिप आहे.
- उष्णतारोधक रचना आणि नवीन थ्री-फेज कुलिंग टेक्नॉलॉजीचाही स्मार्टफोनमध्ये वापर करण्यात आला आहे.
हेही वाचा-Goldprice सोन्यासह चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर
एमआय इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन म्हणाले, की एमआय ११ मध्ये प्रीमियम स्मार्टफोनचे सर्व वैशिष्ट्ये मिळणार आहेत. ग्राहकांना चांगला अनुभव देणारे डिव्हाईस तयार करण्याचा प्रयत्न असल्याचेही जैन यांनी सांगितले.