सेऊल - हुवाईपाठोपाठ सॅमसंग कंपनीही ५ जी स्मार्टफोन बाजारात दाखल करत आहे. याबाबतची घोषणा सॅमसंगने आज केली. सर्वात प्रथम ५ एप्रिलला सॅमसंगचा ५ जी फोन हा दक्षिण कोरियाच्या बाजारपेठेत दाखल होणार आहे.
उद्योगक्षेत्रातील सुत्राच्या माहितीनुसार ५ जी फोनची भारतीय मुल्यात सुमारे ९१ हजार ५०० रुपये एवढी असणार किंमत आहे. तर १ हजार ३३२ डॉलरमध्ये किंमत आहे. सोमवारी दक्षिण कोरियाची नॅशनल रेडिओ रिसर्च एजन्सीने गॅलक्सी एस १० या ५ जी मॉडेलच्या सिग्नलची यशस्वी चाचणी घेतली. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या बाजारपेठेत फोन दाखल करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. दक्षिण कोरियाच्या तीन मोबाईल कंपन्यांनी सॅमसंगच्या व्यावसायिक ५ जी सेवा घेण्यासाठी तयारी केली होती. अमेरिकेच्या व्हेरिझॉन कंपनीने मोटोरोला मोटो झेड ३ हा बाजारपेठेत येण्यापूर्वीएक आठवडाआधीसॅमसंगचा मोबाईल बाजारात येणार आहे.