मुंबई - सॅमसंगने गॅलक्सी एफ६२ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ७ एनएम एक्सीनोस ९८२५ प्रोससर आणि ७००० एमएचची दणकट बॅटरी आहे.
गॅलक्सी एफ६२ ची किंमत २३,९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ६ जीबी/१२८ जीबीमध्ये उपलब्ध आहे. तर ८जीबी/१२८ जीबीमधील स्मार्टफोन २५,९९९ रुपये किंमतीमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन फ्लिकार्ट, रिलायन्स डिजीटल जिओ रिटेल स्टोअर, सॅमसंग डॉट कॉमवर उपलब्ध आहे. तर निवडक रिटेल स्टोअरमध्ये हे स्मार्टफोन २२ फेब्रुवारीला दुपारी वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत.
सॅमसंग इंडियाचे संचालक (मोबाईल बिझनेस) आदित्य बाबर म्हणाले की, ७ एनएम एक्सीनोस ९८२५ प्रोससर आणि ७००० एमएचची दणकट बॅटरी हे खूप चांगले पर्याय ग्राहकाला मिळाले आहेत. हे स्मार्टफोन लेसर ग्रीन, लेसर ब्ल्यू आणि लेसर ग्रेमध्ये उपलब्ध आहेत.
हेही वाचा-महागाईत आणखी भडका: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयाने वाढ
फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्रॅमचा ग्राहकांना पर्याय उपलब्ध-
फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्रॅममध्ये (एफएसयूपी) गॅलक्सीचे सहाय्य मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना गॅलक्सी एफ६२ हा केवळ ७० टक्के रक्कम देऊन खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना हे उत्पादन वर्षभरानंतर परत केल्यानंतर त्यांना ३० टक्के रक्कम द्यावे लागणार नाहीत. मात्र, हा स्मार्टफोनसोबत ठेवण्यासाठी उर्वरित ३० टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.
हेही वाचा-अॅमेझॉनवर विक्रेत्यांना मराठीतही करता येणार व्यवसायाची नोंदणी
ही आहेत गॅलक्सी एफ६२ ची वैशिष्ट्ये-- गॅलक्सी एफ६२ मध्ये ६.७ इंच एफएचडी + सुपर एमओएलईडी प्लस इनफिनिटी ओ डिस्पले आहे. त्यासोबत ४२० नीट्सचा ब्राईटनेस आहे.
- हे डिव्हाईस लेसर ग्रेडियंट डिझाईनमध्ये आहे. त्यामध्ये अँड्राई ११ आणि वन यूआय ३.१ ऑउट ऑफ द बॉक्स आहे.
- गॅलक्सी एफ६२च्या ग्राहकांना अल्टझलाईफ फीचर आहे. त्यामुळे स्मार्टफोनची गोपनीयता ठेवणे शक्य होते. अल्टझलाईफमध्ये वापरकर्त्याला पॉवर कीवर दोनदा क्लिक केल्यानंतर नॉर्मल मोड आणि प्रायव्हेड मोड (सुरक्षित फोल्डर) त्वरित निवडता येतो.
- गॅलक्सी एफ६२ स्पोर्ट्स क्वाड कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये ६४ मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स ६८२ सेन्सर, १२ मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड लेन्स, स्वतंत्र ५ मेगापिक्सेल लेन्स आणि ५ मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आहे.
- डिव्हाईसमध्ये पुढे ३२ मेगापिक्सेल कॅमेरा, ४के व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि स्लो-मो सेल्फीज आहेत.
- स्मार्टफोनमध्ये इन बॉक्स टाईप प्रकारचे २५ वॅटचे सुपरफास्ट चार्जर देण्यात आले आहेत. त्यामुळे ७००० एमएएच बॅटरी दोन तासांहून कमी वेळेत रिचार्ज होते.