नवी दिल्ली - अॅमेझॉनने टेलिव्हजन श्रेणीथ पहिला स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. अॅमेझॉनबेसिक्स ब्रँड असे या स्मार्ट टीव्हीचे नाव आहे. भारतात अॅमेझॉनबेसिक्सची किंमत २९,९९९ रुपयापासून पुढे आहे.
अॅमेझॉनबेसिक्स फायर टीव्ही इडिशनमध्ये अल्ट्रा एचडी टीव्ही ५५ आणि ५५ इंचमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. स्मार्ट टीव्हीला असलेल्या रिमोट कंट्रोलवर प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स अशी बटनेही देण्यात आले आहेत.
हेही वाचा-रिलायन्स इंडस्ट्रीजसह मुकेश अंबानी यांना सेबीकडून ४० कोटींचा दंड
फायर टीव्ही एडिशन स्मार्ट टीव्ही
- अल्ट्रा-एचडी एलईडी (४के) पॅनेलला एचडीआरचा सपोर्ट आहे. तर डॉल्बीचे व्हिजन आहे. हा स्मार्ट टीव्ही भारतीय अॅमेझॉन वेबसाईटवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर क्वाड कोअर अमलॉजिक प्रोससर आहे.
- एचडीएमआयचे ३ पोर्टसह ए-पोर्ट प्रकारचे दोन युसबीएचे पोट स्मार्ट टीव्हाला देण्यात आले आहेत.
- स्मार्ट टीव्हीला अलेक्साही जोडता येते. त्यामुळे ग्राहकांना केवळ बोलून हवे ते गाणी व टीव्ही शो स्मार्ट टीव्हीवर पाहता येणे शक्य होणार आहे.
- अलेक्साला बोलून परिणाम शोधण्यासाठी रिमोटही देण्यात येत आहे.
- कंपनीकडून १ वर्षाची वॉरंटी तर पॅनेलला अतिरिक्त १ वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.
- स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून सेवा आणि जोडणी देण्यात येणार आहे.
हेही वाचा-नववर्षाच्या उंबरठ्यावर जिओची भेट; सर्व नेटवर्क कॉलिंग मोफत!