ETV Bharat / lifestyle

व्हॉट्सअ‌ॅपचे मेसेज सात दिवसानंतर होणार गायब; नवीन फीचर होणार सुरू - WhatsApp new feature news

व्हॉट्सअ‌ॅपच्या माहितीनुसार वापरकर्त्याचे मेसेज हे काही काळानंतर दिसणार नाहीत, असा वापरकर्त्याला पर्याय निवडता येणार आहे. मात्र, ग्रुपमध्ये केलेले मेसेज हे अ‌ॅडमिनला दिसू शकणार आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Nov 3, 2020, 1:22 PM IST

नवी दिल्ली - समाज माध्यमातील अग्रगण्य कंपनी व्हॉट्सअ‌ॅप नवीन फीचर उपलब्ध करून देणार आहे. त्याबाबतची माहिती कंपनीने वारंवार विचारलेल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये (एफएक्यू) दिली आहे.

व्हॉट्सअ‌ॅपच्या माहितीनुसार वापरकर्त्याचे मेसेज हे काही काळानंतर दिसणार नाहीत, असा वापरकर्त्याला पर्याय निवडता येणार आहे. मात्र, ग्रुपमध्ये केलेले मेसेज हे अ‌ॅडमिनला दिसू शकणार आहेत.

असे असणार फीचर

तुम्ही वैयक्तिक अथवा ग्रुपमध्ये केलेले मेसेज हे सात दिवसानंतर दिसणार नाहीत. जर वापरकर्त्याने ते मेसेज सात दिवसानंतर पाहिले नाही तर, ते मेसेज दिसणार नाहीत. मात्र, प्रिव्हूवमध्ये मेसेज दिसू शकणार आहेत. हे मेसेज पुढे पाठविताही येणार नाहीत. हे फीचर मीडिया म्हणजे फोटो व व्हिडिओसाठी लागू होणार आहेत. मात्र, ऑटो डाऊनलोडचा पर्याय निवडल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये फोटो व व्हिडिओ जतन केले जाणार आहेत.

हे फीचर अँड्राईडवरील व्हॉट्सअ‌ॅपच्या 2.19.275 या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र, इतर व्हर्जन, वेब, आयओएस इतर ऑपरेटिंग व्यवस्थेत उपलब्ध केली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, हे फीचर कधी उपलब्ध होणार आहे, याची माहिती कंपनीने जाहीर केली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.