नवी दिल्ली - ट्विटरने वापकरकर्त्यांना खाते लॉग इन करण्यासाठी अधिक सुरक्षितता वाढविली आहे. ट्विटरच्या नव्या सुविधेनुसार वापरकर्त्याला एकाहून अधिक सुरक्षा संकेतांक ( सिक्युरिटी की) वापरता येणार आहेत. यापूर्वी वापरकर्त्याला सुरक्षेसाठी केवळ एकच सुरक्षा संकेतांक वापरता येणे शक्य होते.
सध्या वापरकर्त्याला सुरक्षितपणे लॉग इन करण्यासाठी केवळ एसएमएस किंवा अॅपमधून प्रमाणीकरण (ऑथिन्टिकेशन) करावे लागते. ट्विटरने वापरकर्त्याला सुरक्षेसाठी अधिक पर्याय दिल्याचे ट्विट केले आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्यावर विचार करण्यास केंद्र सरकार तयार
असे होणार ट्विटर खाते अधिक सुरक्षित-
ट्विटमध्ये कंपनीने म्हटले आहे की, तुमचे खाते (अकाउंट) हे विविध सुरक्षा कळीमधून सुरक्षित करा. तुम्ही एका भौतिक कळीशिवाय मोबाईल आणि वेबने लॉग इन करू शकता. याचबरोबर लॉग इनच्या सुरक्षेसाठी केवळ एकच प्रमाणीकरण पद्धत देण्याचा पर्यायही सुरू होणार आहे. यामध्ये ब्ल्यूटूथ किंवा युएसबी संगणकाला जोडल्यानंतर सुरक्षितपणे ट्विटर लॉग इन करता येणे शक्य होणार आहे. हा ऑनलाईन समाज माध्यम खाती (अकाउंट्स) सुरक्षित करण्याचा सर्वाधिक सुरक्षित पर्याय आहे. द्विस्तरीय सुरक्षेच्या प्रमाणीकरणाने ट्विटरचे खाते अधिक सुरक्षित होते. केवळ एकच संकेतांक टाकण्याऐवजी तुम्ही दुसरा सुरक्षा संकेतांकही टाकू शकता. अतिरिक्त सुरक्षा संकेतांकाने फक्त तुम्हीच खाते वापरत असल्याची खात्री होऊ शकते. गतवर्षी कंपनीने लॉग इनसाठी द्विस्तरीय प्रमाणीकरणाचा पर्याय दिला होता.
हेही वाचा-'कर्ज वसुली करणाऱ्या एजंटच्या बेकायदेशीर वर्तणुकीला बँका ठरणार जबाबदार'
अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे ट्विटर झाले होते हॅक-
गतवर्षी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, पंतप्रधान नरेंद्र मोदी, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्यासह विविध प्रसिद्ध व्यक्तींचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. या अकाउंटवरून हॅकरने क्रिप्टोकरन्सीबाबत ट्विट केले होते. अशा घटनांची गांभीर्याने दखल घेत ट्विटर कंपनीने वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षितता लागू करणार असल्याचे जाहीर केले होते.