ETV Bharat / lifestyle

कॅमेरा उत्पादक गोप्रोचे 'क्विक' नवीन अॅप लाँच

author img

By

Published : Mar 18, 2021, 3:17 PM IST

क्विक अॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओ हे फोन आणि कॅमेरामधून घेतले जाऊ शकतात. यामध्ये ग्रो प्रो आणि डीएसएलआरच्या कॅमेरातील फोटोचा समावेश आहे.

Quik
क्विक

नवी दिल्ली- तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ हे अधिक आकर्षक पद्धतीने इडिट करण्याची आवड असेल तर तुम्हाला चांगला पर्याय मिळू शकतो. अमेरिकेची कॅमेरा उत्पादक गोप्रोने क्विक हे नवीन मोबाईल अॅप लाँच केले आहे. हे अॅप ग्रोप्रोऐवजी अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे.

क्विक अॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओ हे फोन आणि कॅमेरामधून घेतले जाऊ शकतात. यामध्ये ग्रो प्रो आणि डीएसएलआरच्या कॅमेरातील फोटोचा समावेश आहे. अॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओ इडिट करण्याचा पर्याय आहे. क्विक हे फोटो आणि व्हिडिओ फोनमधून अधिक गंमतीशीर करण्यासाठी साधा आणि चांगला पर्याय असल्याचे ग्रोप्रोचे संस्थापक आणि सीईओ निकोलस वूडमॅन यांनी म्हटले आहे. त्यासाठी क्विक अॅप तुम्हाला उघडण्याची गरज नाही. फोटो आणि व्हिडिओ हे जतन करणे सोपे आहे. खूप त्वरेने शक्य होत असल्याने अॅपचे नाव क्विक ठेवण्यात आल्याचे वूडमॅन यांनी सांगितले.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्यावर विचार करण्यास केंद्र सरकार तयार

वार्षिक ४९९ रुपये शुल्क-

वापरकर्त्याला फोटो आणि व्हिडिओ हे मूळ दर्जाप्रमाणे क्लाउडमध्ये जतन करणे शक्य आहे. वापरकर्ते व्हिडिओला लायब्ररीमधील संगीत जोडून प्रभावी असे व्हिडिओ तयार करू शकतात. हे अॅप मोफतपणे डाऊनलोड करता येते. तर प्रायोगिकतत्वावर अॅपचा वापर करता येणे शक्य आहे. वापरकर्ते केवळ वार्षिक ४९९ रुपये किंवा मासिक ९९ रुपये भरून वर्षभर सेवा घेऊ शकतात. यामध्ये मोफत अर्मयादित क्लाउड बॅकअप आहे. ग्रोप्रो कॅमेराची सर्व वैशिष्ट्ये क्विक अॅपमध्ये मिळणार आहेत. ग्रोप्रो अॅपच्या वापरकर्ते सर्व डाटा क्विकमध्ये पाठवू शकतात.

हेही वाचा-'कर्ज वसुली करणाऱ्या एजंटच्या बेकायदेशीर वर्तणुकीला बँका ठरणार जबाबदार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.