नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपकडून वापरकर्त्यांसाठी सातत्याने नवनवीन फीचर देण्यात येतात. यामध्ये आणखी एका फीचरची भर पडणार आहे. व्हॉट्सअॅपचा व्हिडिओ संदेश पाठविण्यापूर्वी म्यूट करण्याचा पर्याय वापरकर्त्याला मिळणार आहे.
व्हॉट्सअॅपचे नव्या फीचरची एका ऑनलाईन माध्यमाने माहिती दिली आहे. व्हिडिओ कापण्यापूर्वी आवाज बंद (म्यूट) करण्याचा पर्याय देण्यात येणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. व्हॉट्सअॅपचे संदेश काही दिवसानंतर अदृश्य होणारे आणि वॉलपेपरचे फीचर नुकतेच कंपनीने दिले आहे. स्टेटस अपडेट अथवा व्हिडिओ पाठविण्यापूर्वी त्याचा आवाज बंद करण्याचा पर्याय वापरकर्त्याला मिळणार आहे.
काही दिवस दिसू शकणार मेसेज ...
तुम्ही वैयक्तिक अथवा ग्रुपमध्ये केलेले मेसेज हे सात दिवसानंतर दिसणार नाहीत. जर वापरकर्त्याने ते मेसेज सात दिवसानंतर पाहिले नाही तर, ते मेसेज दिसणार नाहीत. मात्र, प्रिव्हूवमध्ये मेसेज दिसू शकणार आहेत. हे मेसेज पुढे पाठविताही येणार नाहीत. हे फीचर मीडिया म्हणजे फोटो व व्हिडिओसाठी लागू होणार आहेत. मात्र, ऑटो डाऊनलोडचा पर्याय निवडल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये फोटो व व्हिडिओ जतन केले जाणार आहेत.
व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवण्याची सुविधा नुकतेच कंपनीने वापरकर्त्यांना दिली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) व्हॉट्सअॅपला युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वापराची व्हाट्सअपला परवानगी दिली आहे