ETV Bharat / lifestyle

स्पॉटिफाय १२ भारतीय भाषांमध्ये होणार उपलब्ध - music

स्पॉटिफाय हे हिंदी, गुजराती, भोजपुरी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलुगु, उर्दु आणि बंगाली भाषेत उपलब्ध होणार आहे. स्पॉटिफायने म्हटले की, भारतीय वापरकर्त्यांसाठी ओडिओ कंटेन्ट उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.

Spotify
स्पॉटिफाय
author img

By

Published : Mar 12, 2021, 5:37 PM IST

नवी दिल्ली - स्ट्रीमिंगमधील आघाडीची कंपनी स्पॉटीफायने १३ भारतीय भाषांमध्ये ऑडिओ उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे स्पॉटिफाय हे जगभरात एकूण ६२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

स्पॉटिफाय हे हिंदी, गुजराती, भोजपुरी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलुगु, उर्दु आणि बंगाली भाषेत उपलब्ध होणार आहे. स्पॉटिफायने म्हटले की, भारतीय वापरकर्त्यांसाठी ओडिओ कंटेन्ट उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. भारतीयांना त्यांच्या बोलणाऱ्या भाषेत अनुभव उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे. ओडिओ इकोसिस्टिम ही खऱ्या अर्थाने सीमाविरहित असणार आहे.

हेही वाचा-चांदीच्या दरात प्रति किलो १,०९६ रुपयांची घसरण

स्पॉटिफाय मोबोईल अॅप ही आणखी २४ विदेशी भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये रोमनियन, स्वाहिली, स्लाव्हनियन, फिलिपिनो, साधी चायनीज, पोर्तुगीज आणि इतर यांचा समावेश आहे. भाषांचा विस्तार केल्याने श्रोत्यांना जास्त लाभ घेणे शक्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचून लाखो निर्मिकांना (क्रियटर) करियरची संधी देत आहोत. या निर्मिकांना नव्या श्रोत्यांशी जोडणे शक्य होणार आहे.

हेही वाचा-अ‌‌ॅमेझॉनकडून डिजीटल देयक व्यवहारात २२५ कोटींची गुंतवणूक

नवीन जोडण्यात आलेल्या भाषा या वेब माध्यमात उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच त्या मोबाईल अॅपमध्ये जोडण्यात येणार असल्याचे स्पॉटीफायने म्हटले आहे. भाषांचा विस्तार केल्याने वापरकर्त्यांना अधिकचा स्थानिक अनुभव घेता येणे शक्य होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.