ETV Bharat / lifestyle

टिकटॉकप्रमाणे इन्स्टामध्ये करता येणार व्हिडिओ चॅलेंज ; रिमिक्स फीचर लाँच

इन्स्टाग्रामचे वापरकर्ते रिमिक्सचा रीलमध्ये वापर करू शकतात. याचा अर्थ ते दुसऱ्या वापरकर्त्याच्या शेजारी आपला व्हिडिओ अपलोड करू शकतात.

Remix on Reels
इन्स्टा रिमिक्स फीचर
author img

By

Published : Apr 1, 2021, 6:39 PM IST

Updated : Apr 1, 2021, 10:31 PM IST

नवी दिल्ली - इन्स्टाग्रामने चिनी व्हिडिओ अॅप टिकटॉकशी स्पर्धा करणारे नवे फीचर लाँच केले आहे. या फीचरचे नाव रिमिक्स आहे. यामधून नवीन कंटेन्ट तयार करणे, शेअर करणे शक्य आहे.

इन्स्टाग्रामचे वापरकर्ते रिमिक्सचा रीलमध्ये वापर करू शकतात. याचा अर्थ ते दुसऱ्या वापरकर्त्याच्या शेजारी आपला व्हिडिओ अपलोड करू शकतात. हे फीचर टिकटॉकमध्ये लोकप्रिय होते. त्याचा वापर हा डान्स चॅलेंजमध्ये टिकटॉकमध्ये करण्यात येत होता. रिमिक्समध्ये तुम्ही स्वत:चे रील तयार करू शकते. यामध्ये लाईव्ह रुमचे इंटरअॅक्टिव्ह टूल, पॉल आणि स्टोरीजमध्ये प्रश्न करता येतात. एआर इफेक्ट्स आहेत. त्यामुळे लोकांना एकमेकांशी मोठ्या प्रमाणात कनेक्ट करणे शक्य असल्याचे इन्स्टाग्रामने म्हटले आहे.

टिकॉकप्रमाणे इन्स्टामध्ये करता येणार व्हिडिओ चॅलेंज

हेही वाचा-मारुतीसह टोयोटाच्या वाहन विक्रीत मार्चमध्ये दुप्पटीने वाढ

असे काम करते रिमिक्स-

  • रीलमधील मेन्युमध्ये तीन डॉट दिसतात. त्याठिकाणी रिमिक्स धिस रील हा पर्याय निवडा.
  • स्क्रीन ही बदलून तुम्हाला ओरिजनल रील दिसेल. तुम्ही नवीन रील रील आणि रिमिक्स रेकॉर्ड करू शकता.
  • ओरिजनल रीलशेजारीच तुमचे रिमिक्स दिसू शकणार आहे.
  • रेकॉर्ड केल्यानंतर तुम्ही ओरिजनलचा आवाज नियंत्रित करू शकणार आहात. तसेच तुम्ही ओडिओ आणि व्हाईसओव्हरही करू शकता.
  • रील्स गतवर्षी मार्चमध्ये लाँचमध्ये करण्यात आले होते. तेव्हापासून अनेक नवीन फीचर देण्यात आले आहेत.
  • यामध्ये रेकॉर्डिंगची वेळ 30 सेकंदापर्यंत करणे, काउंटडाऊन 10 सेकदांपर्यंत करणे, तसे व्हिडिओ कापणे आणि टाईमलाईनमध्ये क्लिप काढून टाकणे असे फीचर आहेत.
  • ओडियी फीचरही अपडेट करण्यात आले आहे. त्यामध्ये ओडिओ क्लिप जतन करणे शक्य होते. ओडिओ पेज शेअर करणे, ट्रेडिंग पेज शोधणे यांचा समावेश आहे.

हेही वाचा-जीएसटी संकलनाचा आजपर्यंतचा उच्चांक; मार्चमध्ये 1.23 लाख कोटी जमा

Last Updated : Apr 1, 2021, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.