ETV Bharat / jagte-raho

भोसरीमध्ये आढळली मानवी कवटी अन् हाडे, परिसरात खळबळ - human skulls in bhosari

भोसरीमधील बालाजी नगर येथील महापालिकेच्या सुलभ शोचालयाच्या पाण्याच्या हौदात मानवी कवठी व हाडे सापडली आहेत. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कवठी व हाडे
कवठी व हाडे
author img

By

Published : Nov 17, 2020, 3:39 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात मानवी कवटीसह काही हाडे शौचालयाच्या हौदात आढळली आहेत. ही घटना सोमवारी (दि. 16 नोव्हेंबर) उघडकीस आली असून आज समोर आली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. अद्याप, संबंधित आढळले मानवी कवटी आणि हाडे महिलेची आहेत की पुरुषाची हे समजू शकलेले नाही.

शौचालयाच्या हौदात सापडली मानवी कवटी -

भोसरीमधील बालाजी नगर येथे महानगर पालिकेच्या सुलभ शौचालयाच्या पाण्याच्या हौदात एका प्लास्टिकच्या बॅगेत मानवी कवटी आणि हाडे आढळली आहेत. सोमवारी (दि. 16 नोव्हेंबर) रात्री साडेसहाच्या सुमारास काहीजण शौचालयाच्या हौदात असलेले मासे पकडण्यासाठी गेले होते. तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मानवी कवटी आणि शरीराच्या काही भागांची हाडे आढळून आले आहेत. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

स्थानिक नागरिकांकडे पोलिसांची चौकशी सुरू

दरम्यान, मानवी कवटी ही काही हाडांसह मिळाल्याने इतर भागांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, कोणी बेपत्ता झाले आहे का या दिशेने पोलीस तपास करत आहेत. स्थानिक नागरिकांकडे पोलीस चौकशी करत असून काही धागे दोरे जुळतात का हे देखील पोलीस पाहात आहेत. संबंधित हाडे आणि कवटी महिलेची आहे की पुरुषाची हे समजू शकलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.