ETV Bharat / jagte-raho

सावधान ! राज्यात लॉकडाऊन काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ, 500 गुन्हे दाखल

कोरोनाला घेऊन अफवा, जातीय तेढ व कायदा सुव्यवस्था बिघडविण्यासाठी समाजकंटकांकडून सोशल माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. याप्रकरणी राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात आतापर्यंत 500 गुन्हे नोंदविण्यात आले असून 262 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळात राज्यात 500 सायबर गुन्हे दाखल

author img

By

Published : Jun 25, 2020, 7:29 PM IST

मुंबई - कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, कोरोनाला घेऊन नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचा प्रयत्न राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी केला जात असल्याचे सध्या दिसून येत आहे. कोरोनाला घेऊन अफवा, जातीय तेढ व कायदा सुव्यवस्था बिघडविण्यासाठी समाजकंटकांकडून सोशल माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. याबाबत राज्याच्या सायबर विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात आतापर्यंत 500 गुन्हे नोंदविण्यात आले असून 262 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्यात आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९६ गुन्हे दाखल झाले आहेत. तर, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी २०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २७ गुन्हे दाखल झाले आहेत. व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर, इंस्टाग्रामवरुन चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. ऑडिओ क्लिप्स, युट्युबसारख्या सोशल माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी ५८ गुन्हे दाखल झाले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नोंद झालेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या ८ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा राजकीय आशयाचा मजकूर असणारी पोस्ट विविध व्हाट्सअ‌ॅप ग्रुपवर शेअर केली होती. त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या संदर्भात गुन्हा नोंद होऊन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.