व्हर्जिनिया - अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तीनजण ठार झाले आहेत. तर, दोनजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर कुलब्रेथ पोलिसांनी ट्विट करून माहिती सार्वजनिक केली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, की यूव्हीए पोलिस विभाग व्हर्जिनिया विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या संदर्भात ख्रिस्तोफर डार्नेल जोन्सचा शोध घेत आहेत. तुमच्यापैकी कोणाला या हल्लेखोरांबद्दल माहिती असेल तर लगेच 911 वर कॉल करून आम्हाला कळवा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताचे नाव ख्रिस्तोफर डार्नेल जोन्स असे आहे.
क्रिस्टोफरच्या दिसण्यावरून सांगितले जात आहे की त्याने निळ्या जीन्स आणि लाल शूजसह बरगंडी जॅकेट घातलेले आहे. कदाचित काळ्या रंगाची एसयूव्ही चालवत आहे. दुसरीकडे, हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. सर्व पोलीस विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी, CNN च्या अहवालानुसार, जोन्स 2018 मध्ये एक फुटबॉल खेळाडू म्हणून विद्यापीठाच्या ऍथलेटिक्स वेबसाइटवर सूचीबद्ध आहे ज्याने नवीन खेळाडू म्हणून कोणत्याही खेळात भाग घेतला नाही. तो अजूनही यूव्हीएचा विद्यार्थी आहे की नाही हे अस्पष्ट आहे असही ते म्हणाले आहेत.
अधिक माहितीसाठी CNN ने कॅम्पस पोलिसांशी संपर्क साधला आहे. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाबाबत विद्यापीठाच्या उपाध्यक्षांनी सर्वांनी सक्रिय व्हावे, असा इशारा विद्यार्थ्यांना दिला आहे. सर्व कामांवर बारीक लक्ष ठेवा. कुठेही काही संशयास्पद दिसल्यास तत्काळ विद्यापीठ प्रशासनाला कळवा, जेणेकरून प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करता येईल. मात्र, आता वरील प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पोलीस काय कारवाई करतात? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.