ETV Bharat / international

UK Glasgow Gurdwara Row : भारतीय राजदूताला कट्टरवाद्यांनी रोखले, ग्लासगो गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून तीव्र निषेध - uk glasgow gurdwara strongly condemns

UK Glasgow Gurdwara Row : ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना काही कट्टरवाद्यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले होते. याप्रकरणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं भारतीय राजदूताला दिलेल्या वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध केला.

UK Glasgow Gurdwara Row
UK Glasgow Gurdwara Row
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 7:59 AM IST

लंडन UK Glasgow Gurdwara Row : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील गुरुद्वारात लंडनमधील भारतीय राजदूत विक्रम दोराईस्वामी यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेचा अनेक स्तरातून निषेध केला जातोय. ग्लासगो गुरुद्वारानेही या घटनेचा तीव्र निषेध केलाय. युनायटेड किंगडममधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना शनिवारी धार्मिक स्थळी नियोजित पद्धतीनं गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. एका पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतीय राजदूत तिथे गेले होते.

अज्ञातांनी गुरुद्वारात जाण्यापासून रोखलं : गुरूद्वारा व्यवस्थापन समितीनं ग्लासगो गुरुद्वाराबाहेर अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या वर्तनाला 'अपमानजनक घटना' म्हटले आहे. त्यांनी प्रसिद्धपत्रकात म्हटलंय की, गुरुद्वारा सर्व समुदाय आणि पार्श्वभूमीच्या लोकांसाठी खुला आहे. ग्लासगो गुरुद्वारामध्ये 29 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय उच्चायुक्त वैयक्तिक भेटीवर आले होते. याचे निमंत्रण त्यांना स्कॉटिश संसदेच्या सदस्यानं दिलं होतं. ग्लासगो परिसरात बाहेरून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या ताफ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना गुरुद्वारात जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर ते आणि त्यांची टीम येथून परतल्याचं निवेदनात म्हटलंय. तसंच अज्ञात व्यक्तींच्या या टोळक्यानं परिसरातील लोकांनाही त्रास दिला. या घटनेची माहिती स्कॉटलंड पोलिसांनाही देण्यात आल्याचं ग्लासगो गुरुद्वारा गुरु ग्रंथ साहिब शीख सभेनं आपल्या निवेदनात सांगितलंय. या घटनेची संपूर्ण परिस्थिती समजून घेण्यासाठी तपास केला जात असल्याचं स्कॉटलंड पोलीसांनी सांगितलंय. भारतीय उच्चायुक्तांनीही या घटनेची माहिती माध्यमांना दिली.

अनेक ब्रिटीश खासदारांकडून घटनेचा निषेध : उच्चायोगाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील ग्लासगो गुरुद्वारामध्ये घडलेल्या 'अपमानजनक घटने'बाबत उच्चायुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. या घटनेत स्कॉटलंडच्या बाहेरील घटकांचा सहभाग असल्याचं उच्चायुक्तालयानं म्हटलंय. या कट्टरवाद्यांनी भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची भेट पद्धतशीरपणे उधळून लावली. अनेक ब्रिटिश खासदारांनीही या घटनेचा निषेध केलाय. ब्रिटनच्या इंडो-पॅसिफिक राज्यमंत्री अ‍ॅनी-मेरी ट्रेव्हलियन यांनी सांगितलं की, भारतीय राजदूत विक्रम दोराईस्वामी यांना ग्लासगो येथील गुरुद्वारा समितीला भेटण्यापासून रोखण्यात आल्याबद्दल ब्रिटिश खासदारांनी चिंता व्यक्त केली. एक्सवरील (पुर्वीचं ट्विटर) एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की, त्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. यासोबतच युनायटेड किंगडममधील प्रार्थनास्थळे सर्वांसाठी खुली असावीत, असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. S Jaishankar : 'लोकशाहीबाबत इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही', परराष्ट्रमंत्री एस जयशंकर अमेरिकेत 'गरजले'
  2. Canada Travel Advisory India : भारत-कॅनडात तणाव; भारतातील कॅनडा नागरिकांना सतर्क राहण्याचा 'ट्रूडों'चा सल्ला
  3. India Canada Diplomat : जशास तसं, भारताचे कॅनडाच्या राजदूताला ५ दिवसात देश सोडण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.