ETV Bharat / international

Turkey Earthquake Update : तुर्की आणि सीरिया भूकंपातील मृतांची संख्या 47,000 पार - तुर्की आणि सीरिया भूकंपातील मृतांची संख्या

तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 47,000 हून अधिक झाली आहे. प्राणघातक भूकंपामुळे 164,000 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. लोकांना आश्रयासाठी छावण्यांमध्ये दिवस काढावे लागत आहेत.

Turkey Earthquake
तुर्की भूकंप
author img

By

Published : Feb 24, 2023, 9:28 AM IST

अंकारा : तुर्की आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारीला झालेल्या भीषण भूकंपातील मृत्यू पावलेल्यांचा आकडा वाढतच चालला आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून आणखी मृतदेह बाहेर काढले जात आहेत. हते प्रांतात नुकत्याच आलेल्या 6.4 तीव्रतेच्या भूकंपामुळे आणखी इमारतींचे नुकसान झाले आहे. कमकुवत इमारती कोसळल्याने विध्वंसात भर पडली आहे.

अनेक इमारती कोसळल्या : तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारीला आलेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये मृतांची संख्या आता 47,244 वर पोहोचली आहे. बुधवारी उशिरा राज्य प्रसारक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सोयलू म्हणाले की, बचाव पथक ढिगारा साफ करण्यासाठी सतत काम करत आहे. तुर्कीचे पर्यावरण आणि शहरीकरण मंत्री मुरत कुरुम म्हणाले, 'इतर ठिकाणी शोधमोहीम संपली आहे. 6 फेब्रुवारीपासून, किमान 164,000 इमारती कोसळल्या आहेत किंवा तसेच अनेकांचे नुकसान झाले आहे.

सीरियन नागरिकांचा तंबू आणि कारमध्ये आश्रय : उत्तर-पश्चिम सीरियातील स्थानिक नागरी संरक्षणाला स्थानिक पातळीवर द व्हाईट हेल्मेट म्हणून ओळखले जाते. त्यांनी गुरुवारी म्हटले की, हजारो मुले आणि कुटुंबांनी कार आणि तंबूंमध्ये आश्रय घेतला आहे. त्यांना पुन्हा अशा प्राणघातक भूकंपाचा सामना करावा लागेल, अशी भीती आहे. सीरिया सरकारच्या ताब्यात असलेल्या बहरीनच्या प्रदेशातून मदत घेऊन जाणारे विमान राजधानी दमास्कसमध्ये उतरले आहे.

जगातील सर्वात सक्रिय भूकंप झोन : 6 फेब्रुवारीला तुर्कीत आलेला भूकंप हा 1939 पासूनचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 7.8 एवढी होती. या भूकंपामुळे तुर्कीत गेल्या दशकभरात सर्वाधिक जीवित हानी झाली आहे. तुर्की जगातील सर्वात सक्रिय भूकंप झोनमध्ये गणल्या जातो. 1999 मध्ये उत्तर तुर्कीच्या डुझे प्रांतात भीषण भूकंप झाला होता. त्यावेळी या भूकंपात 17,000 हून अधिक लोक मारले गेले होते. तुर्कीतील भूकंपग्रस्त भागात मूलभूत संसाधनांचा नाश झाला असून असून पाणी आणि वीज पुरवढा ठप्प झाला आहे. तुर्कीला दुसऱ्या देशांतून बाटलीबंद पाण्याचा पुरवठा केला जात आहे. भारत सरकारकडून तुर्की आणि सीरियाला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे. तुर्कीमध्ये एनडीआरएफच्या मदत पथकाने अनेकांचे प्राण वाचवले आहे.

हेही वाचा : Earthquake In Tajikistan : ताजिकिस्तानमध्ये भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू; वाचलेल्या लोकांना मानवतावादी मदतीची गरज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.