ETV Bharat / international

Turkey Earthquake : तुर्कीच्या भूकंपातील मृतांचा आकडा 4000 वर पोहचला, थंडी आणि पावसामुळे मदत कार्यात अडथळे - तुर्की भूकंप मृतांचा आकडा

भूकंपामुळे तुर्कीच्या 10 प्रांतांमध्ये आत्तापर्यंत 4000 हून अधिक लोक मारले गेले असून सुमारे 15,000 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपानंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

Turkey Earthquake
तुर्की भूकंप
author img

By

Published : Feb 7, 2023, 7:54 AM IST

Updated : Feb 7, 2023, 10:56 AM IST

अडाना (तुर्की) : तुर्कीमध्ये काल आलेल्या 7.8 तीव्रतेच्या भीषण भूकंपात आत्तापर्यंत 4000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. भूकंपानंतर वाचलेल्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्री उशीरा पर्यंत शोध मोहीम चालू होती. अधिकाऱ्यांच्या मते मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाऊस आणि कडक थंडीमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

अमेरिकेने पाठवली मदत : भूकंपानंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एर्दोगन यांना फोन करून शोक व्यक्त केला. नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीला अमेरिकेने मदत जाहीर केली आहे. व्हाईट हाऊसने सांगितले की ते तुर्कीमध्ये मदत कार्यासाठी शोध आणि बचाव पथके पाठवत आहेत. तुर्कस्तानचा आग्नेय प्रांत कहरामनमारास येथे या भूकांपाचे केंद्र असून त्याचे धक्के सीरीया, बेरूत ते इजिप्तपर्यंत जाणवले.

तुर्कीत अनेक निर्वासित आश्रयाला : बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या एन्क्लेव्हमध्ये शेकडो कुटुंबे ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. या क्षेत्रात युद्धामुळे देशाच्या इतर भागांतून विस्थापित झालेल्या सुमारे 4 दशलक्ष लोक राहतात. तसेच तुर्की हे आजूबाजूच्या देशांतील गृहयुद्धामुळे निर्वासित झालेल्या लाखो लोकांचे घर आहे. यातील अनेक निर्वासित पूर्वीच्या बॉम्बस्फोटांमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये राहतात. तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी ओरहान तातार यांच्या म्हणण्यानुसार, 10 प्रांतांमध्ये सुमारे 7,800 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.

हा प्रदेश भूकंपप्रवण : हा प्रदेश भूकंपप्रवण असून येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. 1999 मध्ये उत्तर-पश्चिम तुर्कीला आलेल्या अशाच शक्तिशाली भूकंपात सुमारे 18,000 लोक मारले गेले होते. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने सोमवारच्या भूकंपाची तीव्रता 7.8 मोजली आहे. भूकंपाच्या उगमाची खोली 18 किलोमीटर होती. भूकांपामुळे एकट्या तुर्कीत ५,६०० हून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्केन्डरून या शहरात रुग्णालयांचे नुकसान झाले असून आणि एक रुग्णालय कोसळले आहे.

नाटो आणि युरोपियन युनियनकडून मदत : तुर्कीला डझनभर देशांकडून तसेच युरोपियन युनियन आणि नाटो यांच्याकडून शोध आणि बचाव पथकांसह वैद्यकीय पुरवठ्याची मदत देण्यात आली आहे. रशिया आणि इस्राइलने सीरियाला मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र ही मदत सीरियाच्या वायव्येकडील बंडखोर प्रांताला मिळणार आहे की नाही याबाबत शंका आहे. हा प्रांत अन्नापासून वैद्यकीय पुरवठ्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी जवळच्या तुर्कीवर अवलंबून आहे.

15,000 पेक्षा अधिक लोक जखमी : तुर्कीच्या 10 प्रांतांमध्ये किमान सुमारे 15,000 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सीरियातील सरकारच्या ताब्यात असलेल्या भागात मृतांची संख्या 656 लोकांवर पोहोचली आहे, तर सुमारे 1,400 जखमी झाले आहेत. तर बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य भागात, तेथे कार्यरत असलेल्या गटांनी सांगितले की तेथे किमान 450 लोक मरण पावले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. तुर्कस्तानच्या हाते प्रांतात कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली बरेच लोक अडकले असून अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : Turkey Earthquake Updates : मध्य तुर्कस्तानला भूकंपाचा तिसरा धक्का; मृतांची संख्या 1300 वर, पाहा व्हिडिओ

Last Updated : Feb 7, 2023, 10:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.