ETV Bharat / international

इस्रायल-हमास यांच्यात युद्धविराम, पहिल्या तुकडीत 13 ओलिसांची होणार सुटका

Israel Hamas war : गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात शुक्रवारी सकाळी 7 वाजता युद्धविराम सुरू होईल आणि ओलिसांची पहिली तुकडी दुपारी 4 वाजता सोडण्यात येईल, असं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं गुरुवारी सांगितलंय. माजिद अल-अन्सारी यांनी दोहा इथं पत्रकारांना सांगितलं की युद्धविरामामध्ये गाझा पट्टीच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही भागात व्यापक युद्धविराम समाविष्ट असेल.

Israel Hamas war
Israel Hamas war
author img

By PTI

Published : Nov 24, 2023, 1:32 PM IST

तेल अवीव Israel Hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यात आजपासून चार दिवसांचा युद्धविराम सुरू होणार आहे. यादरम्यान ओलीस तसंच पॅलेस्टाईनच्या कैद्यांना आज सोडण्यात येणार आहे. कतारनं गुरुवारी ही घोषणा केलीय. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी यासंदर्भात एक निवेदनही जारी केलंय. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजता युद्धविराम सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर 13 महिला आणि मुलांना दुपारी 4 वाजता सोडण्यात येणार आहे. अल-अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोडण्यात येणार्‍या कैद्यांची यादी इस्रायलची गुप्तचर सेवा मोसादकडे पाठवण्यात आलीय.

कतारचे प्रवक्ते काय म्हणाले : कतारच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, मोसाद कतारला ज्यांची सुटका होण्याची शक्यता आहे त्या पॅलेस्टाईन कैद्यांची यादी देईल. या अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं की, दोन्ही यादींची पुष्टी झाल्यानंतर लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सुटकेची प्रक्रिया सुरु झाल्यावर, कैद्यांना हैफा, डॅमन आणि मेगिड्डोच्या आग्नेयेकडील दोन तुरुंगांमधून, व्याप्त वेस्ट बँकमधील रामल्लाहच्या दक्षिणेकडील ओफर तुरुंगात स्थालांतरित केलं जाईल. तिथं रेडक्रॉस सदस्य त्यांची शारीरिक तपासणी करतील. याआधी बुधवारी, एका इस्रायली अधिकाऱ्यानं सांगितलं की, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता युद्धविराम सुरू होईल, त्यानंतर गाझामध्ये बंदिवान असलेल्या 230 हून अधिक लोकांमध्ये किमान 50 महिला आणि मुलांना सोडण्यात येईल. तथापि, युद्धविराम सुरू होण्याच्या काही तास आधी, बुधवारी रात्री उशिरा त्या तयारीला स्थगिती देण्यात आली होती.

युद्धविरामचं पालन केलं जाणार : युद्धविरामाच्या चार दिवसांत कोणताही हल्ला करणार नाहीत, असं हमासनं आपल्या टेलिग्राम चॅनलवर एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलंय. हमासचे प्रवक्ते अबू उबैदा यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलंय की, त्यांचे सैनिक युद्धविरामाचं काटेकोरपणे पालन करतील. त्याचबरोबर, इस्रायली सैन्यानं असंही म्हटलंय की, सैन्य गाझामध्ये राहील पण युद्धविरामा दरम्यान कोणत्याही प्रकारचे हल्ले करणार नाहीत. इस्रायली सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, परिस्थिती कठीण असल्यास काही बदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. इस्रायल हमासमध्ये तात्पुरती युद्धबंदी; इस्रायलच्या मंत्रिमंडळानं दिली मंजुरी, इराणची इस्रायलवर टीका
  2. इस्रायल-हमास संघर्षाचे दीड महिने; युद्धात 13000 हून अधिक पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू
  3. Israel Hamas War : हमासनं गाझातील रुग्णालयात शस्त्रं लपवली? आयडीएफचा दावा काय? वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.