ETV Bharat / international

Texas Shooting : महासत्ता हादरली! मॉलबाहेरील गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू, पोलिसांच्या गोळीबारात मारेकरी ठार

author img

By

Published : May 7, 2023, 8:11 AM IST

Updated : May 7, 2023, 8:27 AM IST

टेक्सासमधील ऍलनच्या डॅलस उपनगरातील एका आउटलेट मॉलमध्ये शनिवारी एका बंदुकधारीने अनेकांवर गोळ्या झाडल्या आहेत. ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.40 च्या सुमारास घडली आहे. या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मुलांचाही समावेश आहे. अॅलन पोलिसांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, जखमी झालेल्या नऊ जणांना रुग्णालयात नेण्यात आले. मारेकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे

वॉशिंग्टन
वॉशिंग्टन

वॉशिंग्टन - अमेरिकेत बंदूक परवान्यांवर कडक निर्बंध नसल्याने सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना नेहमीच घडतात. अशीच घटना पुन्हा एकदा घडली आहे. अॅलन शहरात शनिवारी नेहमीप्रमाणे नागरिक मॉलबाहेर खरेदीसाठी उभे होते. तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाल्यानंतर एकच धांदल उडाली. मात्र, हा माथेफिरून गोळीबार केल्याचे समोर येत आहे.

काही वेळातच तुटलेल्या खिडक्या आणि दारापर्यंत रक्ताचे लोट पडलेले दिसून आले. बाजूला फेकलेल्या चपला आणि रक्ताने माखलेले कपडे पडले होते. कर्मचार्‍यांनी ताबडतोब सुरक्षा गेट खाली आणले. पोलीस येईपर्यंत सर्वांना स्टोअरच्या मागील बाजूला आणत बाहेर काढले. गोळीबाराच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या पेटनने यांनी सांगितले, की, काय घडले आहे, हे पाहण्यासाठी बाहेर पडलो. तेव्हा मला धक्का बसला. काळे कपडे घातलेला एका लठ्ठ माणसाचे शरीर दिसले. तो मारेकरी होता. इतर मृतदेहांप्रमाणे त्याचा मृतदेह झाकला नव्हता.

पोलिसांचा तपास सुरू-स्टोअरमधून बाहेर पडताच रोमेरो म्हणाला, की मॉल रिकामा दिसत होता आणि सर्व दुकानांचे सुरक्षा दरवाजे खाली होते. तेव्हाच त्याला तुटलेली काच आणि जमिनीवर गोळ्या झाडलेले लोक दिसायला लागले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लोक पार्किंगमधून पळत असताना गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. अमेरिकेचे संसद प्रतिनिथी कीथ सेल्फ यांनी सांगितले की अॅलन पोलिस विभागाचे या जागेवर पूर्ण नियंत्रण आहे. गोळीबार करणाऱ्या मारेकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या प्रार्थना आहेत. घटनास्थळावरील सर्व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांसोबत आहेत. ऍलन पोलिस विभागाकडून तपास सुरू आहे. घटनास्थळापासून काही काळ दूर राहण्याचाही पोलिसांनी सल्ला दिला आहे. अॅलन, डाउनटाउन डॅलसच्या उत्तरेस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या उपनगरात अंदाजे १ लाख रहिवासी राहतात.

जो बायडन पुन्हा लढविणार निवडणूक -अमेरिकेच्या बंदूक परवान्यावर नियंत्रण आणण्याचे आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिले आहे. ते पुढील राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत बायडेन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पुन्हा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकन लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला विश्वास आहे की आम्ही पुन्हा सत्ते येऊ, असे ट्विटही बायडेन यांनी केले आहे.

हेही वाचा- SCO summit 2023 In Goa: भारत-चीन द्विपक्षीय चर्चा! जयशंकर अन् चिन कांग यांच्यात चर्चा

हेही वाचा- Putin Assassination: राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, युक्रेनचा रशियावर थेट आरोप

हेही वाचा US President Biden run for reelection बायडन पुन्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत, उमेदवारी केली जाहीर

Last Updated : May 7, 2023, 8:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.