ETV Bharat / international

Sri Lankan New President : श्रीलंकेची संसद पुढील आठवड्यात निवडणार नवीन राष्ट्रपती - Lankan new President elect

श्रीलंकेतील नवीन राष्ट्रपतींची निवडणूक २० जुलै रोजी होणार आहे. ही निवडणूक तेथील संसदेत घेतली जाणार ( Sri Lankan Parliament ) आहे. संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सोमवारी ही घोषणा ( Lankan elect new President next week ) केली.

Sri Lankan New President
श्रीलंकेची संसद पुढील आठवड्यात निवडणार नवीन राष्ट्रपती
author img

By

Published : Jul 12, 2022, 7:23 AM IST

कोलंबो: श्रीलंकेची संसद ( Sri Lankan Parliament ) 20 जुलै रोजी नवीन अध्यक्षाची निवड करणार आहे. नवीन राष्ट्रपती हे गोटाबाया राजपक्षे यांच्यानंतर नियुक्त होतील. संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सोमवारी ही घोषणा ( Lankan elect new President next week ) केली. आज सर्वपक्षीय नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी अद्याप औपचारिक राजीनामा दिलेला नाही. मात्र, 13 जुलै रोजी पद सोडणार असल्याचे त्यांनी शनिवारी सभापतींना कळवले होते. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही नवीन सरकार स्थापन झाल्यावर तेही पद सोडणार असल्याचे सांगितले आहे.

२० जुलै रोजी मतदान : अभयवर्धने म्हणाले की, राजपक्षे यांचा राजीनामा बुधवारी प्राप्त झाल्यानंतर, रिक्त पदाची घोषणा करण्यासाठी 15 जुलै रोजी संसदेची बैठक बोलावण्यात येईल आणि नामांकन स्वीकारण्यासाठी पुन्हा 19 जुलै रोजी बैठक बोलावली जाईल. ते म्हणाले की, नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी 20 जुलै रोजी संसदीय मतदान होणार आहे. राजपक्षे यांनी सार्वजनिक उठावानंतर पक्षाच्या नेत्यांनी राजीनामा देण्याची विनंती स्वीकारून शनिवारी पायउतार होण्याचे मान्य केले आहे.

३० दिवसांच्या आत करावी लागते निवड : श्रीलंकेच्या घटनेनुसार, राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघांनीही राजीनामा दिल्यास, संसदेचे अध्यक्ष कमाल ३० दिवसांच्या कालावधीसाठी कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम करतील. संसद 30 दिवसांच्या आत आपल्या सदस्यांपैकी एकाची निवड करेल, जो अध्यक्ष गोटाबाया यांच्या वर्तमान कार्यकाळातील उर्वरित दोन वर्षांसाठी काम करेल. श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 22 दशलक्ष लोकसंख्या असलेला देश सात दशकांतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. श्रीलंकेकडे परकीय चलनाची तीव्र कमतरता आहे, ज्यामुळे देश इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत लोक रस्त्यावर उतरले असून, देशात सातत्याने निदर्शने होत आहेत.

हेही वाचा : Sri Lanka Crisis : भारताने संकटात सापडलेल्या श्रीलंकेला दिला 44,000 टन युरिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.