कोलंबो: श्रीलंकेतील ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे सरकारविरोधात सातत्याने निदर्शने होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या निदर्शकांनी शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला चारही बाजूंनी घेराव ( Siege of President Gotabaya Rajapaksa residence ) घातला. त्यानंतर त्यांना घर सोडून पळून जावे लागले. त्याच वेळी, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे ( PM Ranil Wickremesinghe )यांनी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि जलद तोडगा काढण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच ते सभापतींना संसद बोलावण्याची विनंती करत आहेत.
श्रीलंकेतील सर्वोच्च वकील संघ, मानवाधिकार गट आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर पोलिसांनी शनिवारी सरकारविरोधी निदर्शनांपूर्वी संचारबंदी उठवली, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. सरकारविरोधी निदर्शने ( Anti-government protests in Sri Lanka ) रोखण्यासाठी कोलंबोसह देशाच्या पश्चिम प्रांतातील सात विभागांमध्ये हा कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
-
Sri Lankan Prime Minister Ranil Wickremesinghe has summoned an emergency Party Leaders meeting to discuss the situation and come to a swift resolution. He is also requesting the Speaker to summon Parliament.
— ANI (@ANI) July 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(File pic) pic.twitter.com/TLZJnZYtFo
">Sri Lankan Prime Minister Ranil Wickremesinghe has summoned an emergency Party Leaders meeting to discuss the situation and come to a swift resolution. He is also requesting the Speaker to summon Parliament.
— ANI (@ANI) July 9, 2022
(File pic) pic.twitter.com/TLZJnZYtFoSri Lankan Prime Minister Ranil Wickremesinghe has summoned an emergency Party Leaders meeting to discuss the situation and come to a swift resolution. He is also requesting the Speaker to summon Parliament.
— ANI (@ANI) July 9, 2022
(File pic) pic.twitter.com/TLZJnZYtFo
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम प्रांतातील सात पोलिस विभागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ज्यात नेगोम्बो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लॅव्हिनिया, नॉर्थ कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि कोलंबो सेंट्रल यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला.
शुक्रवारी घोषणा करताना पोलिस महानिरीक्षक (IGP) सीडी विक्रमरत्ने म्हणाले, ज्या भागात पोलिस कर्फ्यू लागू ( Police curfew imposed ) करण्यात आला आहे, त्या भागात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरातच राहावे आणि कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
-
Enraged protestors storm Sri Lankan President Gotabaya Rajapaksa's house
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/gzq0FS2krN#GotabayaRajapaksa #SriLankaProtests #SriLankaEconomicCrisis pic.twitter.com/UoP5kkZmSx
">Enraged protestors storm Sri Lankan President Gotabaya Rajapaksa's house
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2022
Read @ANI Story | https://t.co/gzq0FS2krN#GotabayaRajapaksa #SriLankaProtests #SriLankaEconomicCrisis pic.twitter.com/UoP5kkZmSxEnraged protestors storm Sri Lankan President Gotabaya Rajapaksa's house
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2022
Read @ANI Story | https://t.co/gzq0FS2krN#GotabayaRajapaksa #SriLankaProtests #SriLankaEconomicCrisis pic.twitter.com/UoP5kkZmSx
बार असोसिएशनने कर्फ्यूला विरोध केला: श्रीलंकेच्या बार असोसिएशनने पोलिस कर्फ्यूला विरोध ( Sri Lankan Bar Association opposes curfew ) केला, तो बेकायदेशीर आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन ( Violation of fundamental rights ) असल्याचे म्हटले. "असा कर्फ्यू स्पष्टपणे बेकायदेशीर आहे आणि आपल्या देशातील लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, जे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांचे सरकार त्यांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल निषेध करत आहेत," बार असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे. श्रीलंकेच्या मानवाधिकार आयोगाने पोलीस कर्फ्यूला मानवी हक्कांचे घोर उल्लंघन म्हटले आहे.
हेही वाचा - Deaths Of Great Leaders : शिंजो आबे यांच्या आधीही 'या' मोठ्या नेत्यांच्या हत्येने हादरले होते जग