ETV Bharat / international

Russia Wagner Rebellion: प्रिगोझिन यांचे बंड शमविण्यात पुतीन यांना यश, गुन्हा घेतला मागे - बेलारूस मास्को

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री एस. पेस्कोव्ह म्हणाले की प्रीगोझिन बेलारूसला जाणार आहेत. रशियन सैन्यात त्यांची सेवा लक्षात घेऊन त्याच्यांबरोबर बंड करणाऱ्या सैनिकांवरदेखील कारवाई केली जाणार नाही. एकप्रकारे रशियाने प्रीगोझिन यांना रशियाने अभय दिल्याचे दिसत आहे.

Russia Wagner Rebellion
प्रिगोझिन यांचे बंड
author img

By

Published : Jun 25, 2023, 8:37 AM IST

मॉस्को: वॅगनर फायटरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचे बंड शमविण्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना यश मिळाले आहे. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मध्यस्थीने केलेल्या करारानुसार मॉस्कोकडे जाणारे प्रीगोझिन यांचे सैन्य थांबणार आहे. करारानुसार वॅगनर नेत्यावरील सर्व आरोप वगळण्यात आल्याचे क्रेमलिनच्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितले. रशियन सैन्याविरुद्ध सशस्त्र बंड पुकारल्याने प्रिगोझिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. माध्यमातील वृत्तानुसार देशाच्या लष्करी नेतृत्वाविरुद्ध प्रिगोझिन यांनी बंडखोरी थांबविली आहे.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री एस. पेस्कोव्हच्या यांनी म्हटले, की उठावात भाग न घेणारे वॅगनरचे सैनिक रशियन संरक्षण मंत्रालयाशी करार करू शकतात. बंडात भाग घेतलेल्या लढवय्यांविरुद्ध कोणताही खटला चालणार नाही, असे त्यांनी आश्वासन दिले. बेलारशियन अध्यक्षांनी देशातील ताण-तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केले. बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ट्विटरवर लिहिले की रात्री 9 वाजता राष्ट्रपतींनी पुन्हा फोनवर चर्चा केली. बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांनी रशियाच्या अध्यक्षांना वॅग्नर ग्रुपच्या नेत्याशी झालेल्या चर्चेतील निर्णयाची माहिती दिली . या कराराबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बेलारशियन अध्यक्षांचे आभार मानले.

रशियामध्ये मोठा रक्तपात होण्याची भीती: वॅगनरची चिलखती वाहने शनिवारी रात्री दक्षिण-पश्चिम रशियाच्या रोस्तोव-ऑन-डॉन येथील लष्करी तळावरून निघाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होते. सैन्य दक्षिणेकडील रोस्तोव्ह-ऑन-डॉन शहरातूनही माघार घेत असल्याची प्रिगोगिनने यापूर्वीच सांगितले. वॅगनर सैनिकांनी महत्त्वाच्या लष्करी आणि नागरी इमारतींचा ताबा घेतला होता. त्यानंतर रशियामध्ये मोठा रक्तपात होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.

नेमके काय घडले होते? भ्रष्ट समजल्या जाणार्‍या रशियन लष्करी अधिकार्‍यांचा सामना करण्यासाठी मॉस्कोला पुढे जात असल्याचा प्रीगोझिन यांनी इशारा दिला होता. मात्र, प्रीगोझिन यांना रशियाच्या कोणत्याही संस्थेकडून पाठिंबा मिळाला नाही. देशाच्या आणि आमच्या लोकांच्या पाठीवर वार केल्याचा आरोप पुतिन यांनी केला. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने (एफएसबी) सशस्त्र बंड पुकारल्याबद्दल प्रीगोझिन यांचा तपास सुरू केला. प्रीगोझन यांच्या बंडाचा वरिष्ठ रशियन राजकीय व्यक्ती आणि सैन्यदलाच्या व्यक्तींनी प्रीगोझिनच्या बंडाचा निषेध केला. बंडातील वॅगनरच्या सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्याचे रशियाने आवाहन केले. त्यानंतर काही वेळातच हे बंड थंड झाले.

हेही वाचा-

  1. Wagner Group Rebel : रशियाविरुद्ध वॅगनर सेनेचा उठाव ; पुतीन म्हणाले - कठोर उत्तर देणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.