चंदीगड : पंजाबी गँगस्टर रविंदर समरा याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी त्याला गुंड घोषित केले होते. रविंदर समराची कॅनडाच्या रिचमंडमध्ये हत्या करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याचा भाऊ व कुख्याता गुंड अमरप्रीत समराचाही खून झाला होता. तो कॅनडातील टॉप-10 गुंडांपैकी एक होता. या घटनेसाठी ब्रदर्स कीपर ग्रुपला जबाबदार धरले जात आहे.
गॅंगवॉरमधून हत्या : मिळालेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय रविंदर समरा याची ब्लॉक मिनार रोडवर संध्याकाळी 6:45 वाजता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीमचे अधिकारी सुखी ढेसी यांनी सांगितले की, समराची हत्या ब्रिटिश कोलंबियामधील गॅंगवॉरमुळे झाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी चार ते पाच स्फोट ऐकले आणि त्यानंतर मशीनगनमधून गोळीबार झाला.
प्रत्यक्षदर्शींची चौकशी : 36 वर्षीय रविंदर समरा हा गुंड अमरप्रीत समरा याचा भाऊ आहे. तो कॅनडातील मोस्ट वॉन्टेड गुंडांपैकी एक होता. अमरप्रीतचीही 28 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आयएचआयटीचे प्रवक्ते सुखी ढेसी यांनी एका निवेदनात सांगितले की, पोलिसांना समराविषयी माहिती होती. त्याची हत्या एक टार्गेट किलिंग होती. पोलिस अधिकारी आता प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत. त्यांच्याकडे डॅशकॅम किंवा सीसीटीव्ही फुटेज असू शकतात.
दोन महिन्यांपूर्वी भावाची हत्या झाली होती : रविंदर समरा याचा भाऊ अमरप्रीत समरा याची दोन महिन्यांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 28 वर्षीय अमरप्रीतची कॅनडातील व्हँकुव्हर शहरात एका लग्नाच्या ठिकाणी अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमरप्रीत समरा याची 28 मे रोजी पहाटे 1.30 वाजता प्रजार रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या काही मिनिटे आधी, तो लग्नाच्या इतर पाहुण्यांसोबत फ्रेझरव्ह्यू बँक्वेट हॉलच्या डान्स फ्लोरवर होता. समरा आणि त्याचा मोठा भाऊ रविंदर यांना लग्नात पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
हेही वाचा :