मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मेक इन इंडिया या योजनेचे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू केलेल्या मेक इन इंडियाचे आता भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगले परिणाम दिसत असल्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले. त्यामुळे जागतिक पातळीवर मेक इन इंडिया या संकल्पनेचे कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.
मॉस्कोतील कार्यक्रमात भारतीय अर्थव्यवस्थेचे उदाहरण : आमचे भारतातील मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात मेक इम इंडिया ही योजना सुरू केली. या मेक इन इंडियाचे आता भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगले परिणाम दिसत असल्याचे उदाहरण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मॉस्कोतील कार्यक्रमात दिले. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारताच्या अर्थव्यवस्था आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्याचे हे वृत्त रशिया सरकराच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिले आहे.
रशिया भारत मैत्री आणखी घट्ट : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडिया योजनेचे कौतुक केले आहे. रशियाच्या राष्ट्रपतींनी रशियातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे उदाहरण दिल्याचे रशियाच्या वृत्तसंस्थेने स्पष्ट केले आहे. अलीकडेच नवी दिल्लीतील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह रशिया भारत यांच्या संयुक्त भागीदारीने ताकद दाखवली आहे. ती नेहमीप्रमाणे मजबूत होत आहे.
रशिया भारत संबंध बिघडवण्याचे प्रयत्न सुरू : जागतिक स्तरावर रशियाबद्दल सतत खोटे बोलले जात आहे. रशिया आणि भारताचे संबंध बिघडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी रशियन फेडरेशनच्या राष्ट्रीय दिनाला समर्पित राजधानीत स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात सांगितले आहे. मात्र भारत आणि रशियाची मैत्री अतुट असून आम्ही जगाला आमच्या मैत्रिची दाखवली आहे. त्यामुळे भारत आणि रशियाची मैत्री अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
पुतिन प्रिगोझिनमध्ये करार : गेल्या काही दिवसात रशियाला आपल्याच सैन्याच्या बंडाचा सामना करावा लागला आहे. नाटो देशांना खुले आव्हान देणाऱ्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्याच घरात खरा धोका होता. रशियाच्या खासगी सैन्याने उठाव केला, मात्र पुतिन यांनी 24 तासात हा उठाव मोडून काढला. वॅग्नर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझिन यांनी काही अटींवर पुतिन यांच्याशी करार केला. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी या करारासाठी मध्यस्थी केली. लुकाशेन्को यांनी केलेल्या करारानुसार प्रिगोझिनने रशिया सोडून शेजारच्या बेलारूसला जाण्याचे मान्य केले. पुतिन यांनी प्रीगोझिन यांना बेलारूसला जाण्यास सांगितले. त्या बदल्यात ते प्रिगोझिनविरुद्धचा बंडखोरीचा खटला मागे घेतील.
हेही वाचा -