पोर्ट मोरेस्बी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसाच्या जी 7 शिखर परिषदेच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या दौऱ्यानंतर पापुआ न्यू गुनिया येथे भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल बॉब डेडे यांच्याशी सोमवारी पहिल्या भेटीवर आल्याच्या काही तासांनंतर चर्चा केली. भारत आणि 14 पॅसिफिक बेट देशांमधील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
-
#WATCH पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पापुआ न्यू गिनी के गवर्नर जनरल सर बॉब दादा से मुलाकात की। pic.twitter.com/WEeRzVrXXY
— ANI_HindiNews (@AHindinews) May 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पापुआ न्यू गिनी के गवर्नर जनरल सर बॉब दादा से मुलाकात की। pic.twitter.com/WEeRzVrXXY
— ANI_HindiNews (@AHindinews) May 21, 2023#WATCH पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पापुआ न्यू गिनी के गवर्नर जनरल सर बॉब दादा से मुलाकात की। pic.twitter.com/WEeRzVrXXY
— ANI_HindiNews (@AHindinews) May 21, 2023
नरेंद्र मोदी आणि जेम्स मारापे यांच्यात चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एला बीच येथील APEC हाऊसला भेट दिली. त्यानंतर पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पंतप्रधान मोदी त्यांच्या पापुआ न्यू गिनी पंतप्रधानांशी हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्ट मोरेस्बी येथील एला बीचच्या काठावर असलेल्या आयकॉनिक APEC हाऊसमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केल्याची माहितीही या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.
-
#WATCH पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पापुआ न्यू गिनी के गवर्नर जनरल सर बॉब दादा से मुलाकात की। pic.twitter.com/WEeRzVrXXY
— ANI_HindiNews (@AHindinews) May 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पापुआ न्यू गिनी के गवर्नर जनरल सर बॉब दादा से मुलाकात की। pic.twitter.com/WEeRzVrXXY
— ANI_HindiNews (@AHindinews) May 21, 2023#WATCH पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पापुआ न्यू गिनी के गवर्नर जनरल सर बॉब दादा से मुलाकात की। pic.twitter.com/WEeRzVrXXY
— ANI_HindiNews (@AHindinews) May 21, 2023
दोन्ही देशाच्या सहकार्याला चालना देण्यासाठी परिषद : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी जपानहून पापुआ न्यू गुनी येथे आले आहेत. जापानला त्यांनी G7 प्रगत अर्थव्यवस्था शिखर परिषदेला हजेरी लावली आणि अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पापुआ न्यू गिनी येथे येऊन पंतप्रधान पंतप्रधान जेम्स मारापे यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यावेळी 'दोन्ही नेते प्रादेशिक सहकार्याला चालना देण्यासाठी FIPIC III शिखर परिषदेचे आयोजन करणार असल्याचे नमूद केले. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिजीच्या दौऱ्यादरम्यान FIPIC लाँच करण्यात आले होते. मात्र ही परिषद चीन या प्रदेशात आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात असताना होत असल्याने चर्चेत आहे.
भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट : पापुआ न्यू गिनीला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पोहोचले आहेत. त्यांचे विमानतळावर पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श केला. सहसा पापुआ न्यू गिनी सूर्यास्तानंतर आलेल्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत करत नाही.
शिखर परिषदेत 14 देशांचे नेते होणार सहभागी : मात्र, हे पीएम मोदींसाठी करण्यात आले. त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. FIPIC परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे सर्व नेत्यांची बैठक शक्य होत नाही. FIPIC मध्ये कुक बेटे, फिजी, किरिबाती, मार्शल बेटांचे प्रजासत्ताक, मायक्रोनेशिया, नाउरू, नियू, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, सामोआ, सोलोमन बेटे, टोंगा, तुवालू आणि वानुआतु यांचा समावेश होतो.
हेही वाचा -