नवी दिल्ली : २०th ASEAN Indian Summit : इंडोनेशियातील जकार्ता येथे 20 व्या 'आसियान-भारत' शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. इंडोनेशिया आणि आमची (भारत) भागीदारी चौथ्या दशकात पोहोचली आहे. या शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल मी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचं अभिनंदन करतो. गेल्या वर्षी आम्ही भारत-आसियान मैत्री दिन साजरा केला होता. आता त्याचं रूपांतर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
#WATCH | Prime Minister Narendra Modi arrives at Jakarta Convention Centre in Indonesia to attend the 20th ASEAN-India Summit and 18th East Asia Summit. pic.twitter.com/Du3pNn6gR3
— ANI (@ANI) September 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Prime Minister Narendra Modi arrives at Jakarta Convention Centre in Indonesia to attend the 20th ASEAN-India Summit and 18th East Asia Summit. pic.twitter.com/Du3pNn6gR3
— ANI (@ANI) September 7, 2023#WATCH | Prime Minister Narendra Modi arrives at Jakarta Convention Centre in Indonesia to attend the 20th ASEAN-India Summit and 18th East Asia Summit. pic.twitter.com/Du3pNn6gR3
— ANI (@ANI) September 7, 2023
पंतप्रधानांचं भव्य स्वागत - पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 व्या आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गुरुवारी सकाळी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे पोहोचले. रिट्झ कार्लटन हॉटेलबाहेर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी विमानतळावर तसेच हॉटेलबाहेर भारतीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच जमलेल्या भारतीयांनी 'वंदे मातरम' आणि 'मोदी-मोदी'च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीयांना अभिवादन करत त्यांच्यासोबत संवाद साधला.
-
#WATCH | At the ASEAN-India Summit in Jakarta, Indonesia, Prime Minister Narendra Modi says "Our partnership has reached the fourth decade. It is an honour for me to co-chair this Summit. I want to congratulate Indonesian President Joko Widodo for organising this Summit..." pic.twitter.com/MQfVQayV3G
— ANI (@ANI) September 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | At the ASEAN-India Summit in Jakarta, Indonesia, Prime Minister Narendra Modi says "Our partnership has reached the fourth decade. It is an honour for me to co-chair this Summit. I want to congratulate Indonesian President Joko Widodo for organising this Summit..." pic.twitter.com/MQfVQayV3G
— ANI (@ANI) September 7, 2023#WATCH | At the ASEAN-India Summit in Jakarta, Indonesia, Prime Minister Narendra Modi says "Our partnership has reached the fourth decade. It is an honour for me to co-chair this Summit. I want to congratulate Indonesian President Joko Widodo for organising this Summit..." pic.twitter.com/MQfVQayV3G
— ANI (@ANI) September 7, 2023
एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य : शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, २१ वे शतक आशियाचं आहे. प्रगतीसाठी नवीन संकल्प केलं जात आहेत. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा आपला मंत्र आहे. ही परिषद आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपला इतिहास आणि भूगोल भारत आणि आसियानला एकत्र करतो. यासोबतच सामायिक मूल्ये, प्रादेशिक एकात्मता आणि शांतता, समृद्धी आणि बहु-ध्रुवीय यावर आमचा सामायिक विश्वास आहे. आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा मध्यवर्ती स्तंभ आहे.
हेही वाचा -