वॉशिंग्टन डीसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाजरीपासून पदार्थ तयार करण्याला प्रोत्साहन देतात. या आवाहनाने प्रेरित होऊन, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी, जिल बायडेन यांनी त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या शासकीय डिनरमध्ये बाजरीपासून तयार केलले पदार्थ ठेवले आहेत. जिल बायडेन यांनी स्वत: अतिथी शेफ नीना कर्टिस, व्हाईट हाऊसचे कार्यकारी शेफ ख्रिस कॉमरफोर्ड आणि व्हाईट हाऊसचे कार्यकारी पेस्ट्री शेफ सुसी मॉरिसन यांच्यासोबत रात्रीच्या जेवणासाठी तयारी केली आहे.
आणि ग्रील्ड कॉर्न कर्नल सॅलड पहिल्या कोर्समध्ये आहे. यामध्ये टरबूज आणि तिखट एवोकॅडो सॉसची चवही आहे. मुख्य कोर्समध्ये स्टफ्ड पोर्टोबेलो मशरूम आणि क्रीमी केशर-इन्फ्युस्ड रिसोट्टो यांचाही समावेश होता. त्यात सुमाक-रोस्टेड सी बासचा समावेश होता. त्याच्यासोबत लिंबू-बडीशेप दही सॉस, कुरकुरीत बाजरी केक्स आणि उन्हाळी स्क्वॅश आहे. बाजरीचे महत्त्व ओळखून लोकांना पौष्टिक अन्न पुरवणे तसेच देशांतर्गत आणि जागतिक मागणी निर्माण करणे, हे भारताचे उद्दिष्ट आहे.
बाजरीचे हे आहेत फायदे:भारत सरकारच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. या मोहिमेमधून जगभरातील करोडो लोकांच्या पोषण गरजा पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. बाजरी आरोग्यासाठी चांगली व शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. तसेच पर्यावरणाला अनुकूल मानली जाते. बाजरीचे पिक घेण्यासाठी कमी असते. ती दुष्काळातही अन्नाची गरज भागवू शकते. कोरड्या जमिनीत आणि डोंगराळ भागात सहज पिकवता येते असून त्यावर किडीचा कमी प्रार्दूभाव होतो.
अशी आहे तयारी: पंतप्रधान मोदींसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या शासकीय भोजनाबद्दल माहिती देताना, जिल बायडेन म्हणाल्या, की पाहुणे सुरुवातीला दक्षिण लॉनवर हिरव्या रंगात सजवलेल्या पॅव्हेलियनमध्ये जाणार आहेत. प्रत्येक टेबलावर भगव्या रंगाची फुले असणार आहे. त्यामध्ये तिरंगा प्रतिबिंबित असेल. युनायटेड स्टेट्सच्या अधिकृत राज्य भेटीचा एक भाग म्हणून, फर्स्ट लेडी जिल या करिअर शिक्षण आणि कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत.
अमेरिकन चवीसह शुद्ध शाकाहारी मेनू असणार: व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींच्या शासकीय डिनरच्या मेनूची जबाबदारी शेफ नीना कर्टिस यांच्याकडे सोपवण्यात आली होती. नीना कर्टिस म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींसाठी खास डिश तयार करण्यासाठी काही महिने लागले. पंतप्रधान मोदींचे आवडते पदार्थ लक्षात घेऊन शासकीय डिनरचा मेनू तयार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत भव्य स्वागत करण्यात आले आहे. दोन्ही देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा-
- PM Modi meets Jill biden: शिक्षण हा भारत आणि अमेरिका यांच्यातील सखोल संबंधांचा आधारस्तंभ: जिल बायडेन
- PM Modi USA Visit : व्हाईट् हाऊसमध्ये जो बायडेन अन् फस्ट लेडीने केले पंतप्रधान मोदींचे स्वागत
- अमेरिकेतही विक्रम! संयुक्त राष्ट्र मुख्यालयातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वातील योग कार्यक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद