ETV Bharat / international

इस्लामाबादमधील कृष्ण मंदिराचे बांधकाम पाकिस्तानने थांबवले

author img

By

Published : Jul 5, 2020, 9:17 AM IST

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हिंदू धर्मियांसाठी कृष्ण मंदिर उभारण्यात येत होते. मात्र, कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने (सीडीए) शुक्रवारी कायदेशीर कारणांमुळे मंदिराच्या भूखंडावरील बांधकाम थांबविले आहे.

कृष्णा मंदिर
कृष्णा मंदिर

इस्लामाबाद - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हिंदू धर्मियांसाठी कृष्ण मंदिर उभारण्यात येत होते. मात्र, कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने (सीडीए) शुक्रवारी कायदेशीर कारणांमुळे मंदिराच्या भूखंडावरील बांधकाम थांबविले आहे.

योजनेनुसार कृष्ण मंदिर हे एच-9 या प्रशासकीय विभागाच्या भूखंडातील 20 हजार चौरस फुट जागेवर उभारण्यात येणार होते. मानवाधिकार संसदीय सचिव लालचंद मल्ही यांच्या हस्ते नुकतचं भूमिपूजन करण्यात आले होते.

इमारत नियंत्रण विभाग शुक्रवारी मंदिर भूखंडाला भेट दिली. मंदिर इमारत आराखडा सादर करावा लागेल आणि तो मंजूर झाल्यानंतरच पुढील बांधकाम सुरू करता येईल, असे त्यांनी बांधकाम करणाऱ्यांना लोकांना सांगितले.

दरम्यान संबधित भूखंड 2017 मध्ये एका स्थानिक हिंदू समितीला सोपवण्यात आला होती. पण, प्रशासकीय कारणांमुळे मंदिर बांधकामाचं काम मध्येच अडकलं होतं. मंदिर निर्माणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सरकारकडून 10 कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणाही पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती.

इस्लामाबादमध्ये हिंदूंची लोकसंख्या सुमारे 3 हजार आहे. ज्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी, व्यापारी समुदायाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने डॉक्टर यांचा समावेश आहे. हिंदूंचा पाकिस्तानमधील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानात 75 लाख हिंदू राहतात. पाकिस्तानची बहुसंख्य हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.