स्टॉकहोम Nobel Prize 2023 : हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना यंदाचं अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झालंय. त्यांना श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील संशोधनासाठी हा पुरस्कार जाहीर झाला. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस हॅन्स एल्ग्रेन यांनी सोमवारी स्टॉकहोममध्ये या पुरस्काराची घोषणा केली.
-
BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2023 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel to Claudia Goldin “for having advanced our understanding of women’s labour market outcomes.”#NobelPrize pic.twitter.com/FRAayC3Jwb
">BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2023
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2023 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel to Claudia Goldin “for having advanced our understanding of women’s labour market outcomes.”#NobelPrize pic.twitter.com/FRAayC3JwbBREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2023
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2023 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel to Claudia Goldin “for having advanced our understanding of women’s labour market outcomes.”#NobelPrize pic.twitter.com/FRAayC3Jwb
क्लॉडिया गोल्डिन यांचं कार्य : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणारी गोल्डिन तिसरी महिला आहे. त्या हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत. १९८९ ते २०१७ या काळात त्या NBER च्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांवरील महत्त्वपूर्ण कामासाठी गोल्डिन ओळखल्या जातात. नोबेल समितीनं पारितोषिकाच्या घोषणेदरम्यान सांगितलं की, गोल्डिन यांच्या संशोधनानं महिलांच्या कमाईबाबत पहिला सर्वसमावेशक लेखाजोखा उपलब्ध करून दिला.
अर्थशास्त्रातील नोबेल जिंकणारी तिसरी महिला : मागील वर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल माजी फेडरल रिझर्व्ह चेअरमन बेन बर्नान्के, डग्लस डब्ल्यू. डायमंड आणि फिलिप डायबविग यांना मिळाला होता. त्यांनी २००७-०८ मध्ये अमेरिकेत आलेल्या आर्थिक संकटादरम्यान बँकेच्या अपयशावर संशोधन केलं होतं. आतापर्यंत ९२ जणांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यापैकी फक्त दोन महिला आहेत. क्लॉडिया गोल्डिन या अर्थशास्त्रातील नोबेल जिंकणाऱ्या फक्त तिसऱ्या महिला आहेत.
नोबेल पारितोषिक विजेत्याला मिळणारी रक्कम : नोबेल पारितोषिक विजेत्याला ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (१ दशलक्ष यूएस डॉलर) रोख पारितोषिक मिळते. विजेत्यांना डिसेंबरमध्ये ओस्लो आणि स्टॉकहोम येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात १८ कॅरेटचं सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्रदान केलं जातं.
२०२३ नोबेल पुरस्कार विजेते : एका आठवड्यापूर्वी हंगेरियन अमेरिकन कॅटालिन कॅरिको आणि अमेरिकन ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं. मंगळवारी भौतिकशास्त्राचा पुरस्कार फ्रेंच-स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ अॅन ल'हुलियर, फ्रेंच शास्त्रज्ञ पियरे अगोस्टिनी आणि हंगेरियामध्ये जन्मलेल्या फेरेंक क्रूझ यांना प्रदान करण्यात आला. अमेरिकन शास्त्रज्ञ मौंगी बावेंडी, लुईस ब्रुस आणि अॅलेक्सी एकिमोव्ह यांनी बुधवारी रसायनशास्त्राचा पुरस्कार जिंकला. त्यापाठोपाठ नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं. शुक्रवारी तुरुंगात असलेल्या इराणी कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.
हेही वाचा :