बँकॉक लष्करशासित म्यानमारमधील न्यायालयाने सोमवारी देशाच्या पदच्युत नेत्या आंग सान स्यू की यांना भ्रष्टाचाराच्या आणखी आरोपांमध्ये दोषी ठरवले. त्यांना अतिरिक्त सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्याबाबतीत इन कॅमेरा खटला सुरू होता.
त्यांच्या वकिलांना कारवाईबद्दल माहिती उघड करण्यापासून रोखण्याच्या आदेशाद्वारे मनाई करण्यात आली होती. सोमवारी निर्णय घेतलेल्या चार भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सू की यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सार्वजनिक जमीन बाजारभावापेक्षा कमी दराने भाड्याने दिली आणि धर्मादाय हेतूंसाठी देणग्या देऊन निवासस्थान बांधले.
त्यांना चार गुन्ह्यांपैकी प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा झाली. परंतु त्यापैकी तिघांची शिक्षा एकाचवेळी ठोठावण्यात येईल. एकूण सहा वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल. त्यांनी मात्र सर्व आरोप नाकारले त्यामुळे त्यांचे वकिल अपील करणे अपेक्षित आहे.
लष्कराने निवडून आलेले सरकार बरखास्त केल्यानंतर आणि फेब्रुवारी 2021 मध्ये ताब्यात घेतल्यानंतर देशद्रोह, भ्रष्टाचार आणि इतर आरोपांनुसार 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.