लंडन (यूके): ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्या म्हणाल्या की, त्यांची मुलगी अक्षता मूर्ती यांनी सुनक यांना यूकेचे पंतप्रधान केले आहे. ऋषी सुनक यांच्या प्रगतीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याच्या रंजक कथा यापूर्वीही समोर आल्या आहेत. आता सुधा मूर्ती यांनी दावा केला आहे की, सुनक यूकेच्या पंतप्रधान होण्यामागे त्यांच्या मुलीचा हात होता. सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांचा एक व्हिडिओ याअनुषंगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या दावा करत आहेत की, ऋषी सुनक त्यांच्या मुलीमुळे ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
व्हिडीओमध्ये सुधा मूर्ती असे म्हणतात की, मी माझ्या पतीला बिझनेसमन बनवले आहे. माझ्या मुलीने तिच्या पतीला यूकेचे पंतप्रधान केले. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सुधा मूर्ती यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हा पत्नीचा गौरव आहे. बायको नवरा कसा बदलू शकते ते यातून पाहा. मात्र, मी माझा नवरा बदलू शकलो नाही. मी माझ्या पतीला उद्योगपती बनवले आणि माझ्या मुलीने तिच्या पतीला पंतप्रधान केले.
ऋषी सुनक यांनी 2009 मध्ये अक्षता मूर्तीशी लग्न केले. त्यानंतर ब्रिटीश राजकारणात त्यांचा दर्जा वाढत गेला. जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक असलेल्या नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती स्वतः 730 दशलक्ष पौंड संपत्तीची मालक आहे. अक्षता हिची गणना जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये केली जाते. त्यांचे आई-वडील नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती हे कोट्यवधींची संपत्ती असलेल्या इन्फोसिस या टेक कंपनीचे मालक आहेत. मूर्ती दाम्पत्य सहसा मीडिया स्पॉटलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.
नारायण मूर्ती, अक्षता मूर्तीचे वडील हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. सुनक यांना वयाच्या ४२ व्या वर्षी आधुनिक इतिहासात ब्रिटनचे सर्वात तरुण खासदार आणि पंतप्रधान बनण्याचा मान मिळाला आहे. अक्षता मूर्तीची आई सुधा मूर्ती देखील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सांगत आहेत की, तिच्या मुलीचा पंतप्रधानांच्या जीवनावर, विशेषतः त्यांच्या आहारावर कसा प्रभाव पडला आहे. त्या सांगतात की मूर्ती कुटुंबाने दर गुरुवारी उपवास करण्याची परंपरा फार पूर्वीपासून पाळली आहे. त्या म्हणतात की, इन्फोसिसचीही सुरुवात गुरुवारीच झाली. त्या म्हणाल्या की, राघवेंद्र स्वामींच्या सांगण्यावरून सुनक आणि अक्षता यांनीही गुरुवारी उपवास सुरू केला. मात्र, सुनक यांची आई सोमवारी उपवास करते.