ETV Bharat / international

Kerala Man stuck in Afghanistan : अफगाणिस्तानात अडकलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचे भारत सरकारकडे मदतीचे आवाहन - अफगाणिस्तानात अडकले

केरळमधील एक व्यक्ती 2020 मध्ये संशोधनाच्या निमित्ताने अफगाणिस्तानला गेले होते. मात्र तालिबानच्या कब्ज्यानंतर तेथील परिस्थिती बदलली. आता ते व्हिसा मिळविण्यासाठी जवळपास एक वर्ष वाट पाहत आहेत. (kerala man stuck in Afghanistan waiting for visa). केरळमधील त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले पण आजपर्यंत त्यांना यश आले नाही.

Man stuck in Afghanistan
Man stuck in Afghanistan
author img

By

Published : Jan 8, 2023, 8:12 PM IST

तिरुअनंतपुरम : बेपत्ता असलेल्या वडिलांना परदेशातून परत आणण्यासाठी नऊ वर्षांच्या मुलीने भारत सरकारला हृदयस्पर्शी आवाहन केले आहे. तिचे वडील दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात अडकले होते आणि ते आपल्या कुटुंबाकडे परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केरळ विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील पोस्टडॉक्टरल फेलो गुलाबमिर रहमानी 2020 मध्ये त्यांच्या संशोधनासंदर्भात डेटा गोळा करण्यासाठी अफगाणिस्तानला गेले होते. (kerala man stuck in Afghanistan waiting for visa).

इराणमार्गे भारतात परतण्याचा प्रयत्न : 2020 मध्ये अमेरिकन सरकारने तेथे तैनात असलेले आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तालिबानने देशाचा ताबा घेतला. त्यामुळे व्हिसा नूतनीकरणाची प्रक्रिया रहमानीच्या कुटुंबासाठी एक दुःस्वप्न ठरली. भू-राजकीय परिस्थितीतील बदल लक्षात घेऊन भारत सरकारने अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांचे व्हिसा रद्द केले आणि परिणामी रहमानी तिथेच अडकले. त्यानंतर रहिमानी यांनी इराणमार्गे भारतात परतण्याचा प्रयत्न केला, पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही. ते तेहरानमध्ये व्हिसा मिळविण्यासाठी जवळपास एक वर्ष वाट पाहत आहेत.

एका वर्षापासून तेहरानमध्ये अडकले : रहमानी यांनी इराणमधून एका व्हॉट्सअॅप कॉलवर एजन्सीला सांगितले की, 'माझ्या संशोधनाचा विषय अफगाणिस्तानशी संबंधित होता आणि मी डेटा गोळा करण्यासाठी तिथे गेलो होतो. मला माझा व्हिसाही रिन्यू करायचा होता. मात्र, अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थिती बदलली आणि मी तिथेच अडकलो. नंतर मला इराणचा व्हिसा मिळाला आणि मी भारतात परत यावे म्हणून तिथे गेलो. पण भारतीय दूतावास मला व्हिसा देण्यास नकार देत असल्याने मी जवळपास एका वर्षापासून तेहरानमध्ये अडकलो आहे.

पत्नी आणि मुलांची परिस्थिती खराब : केरळ विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर ग्लोबल अॅकॅडेमिक्स' (सीजीए) चे संचालक प्रोफेसर साबू जोसेफ यांनी सांगितले की, रहमानी परदेशात अडकल्यामुळे तिरुअनंतपुरममधील त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. रहमानीची पत्नी झमझमा म्हणाली, 'मला कोविड-19 ची लागण झाली आणि मला घरात एकटे राहावे लागले. यावेळी माझ्या मुलांची काळजी घेणारे कोणी नव्हते. मला घरातील सर्व कामे सांभाळावी लागतात. गरज पडल्यास मुलांना दवाखान्यात नेणे, घरातील वस्तू खरेदी करणे, हे सर्व मी माझ्या अभ्यासासोबतच करते. मी घरून संशोधन कार्य करू शकत नाही, कारण माझ्याकडे प्रयोगशाळेचे काम देखील आहे. रहमानीची नऊ वर्षांची मुलगी रडत म्हणाली, 'आम्हाला त्यांची खूप आठवण येते. इथे इंटरनेटच्या समस्येमुळे आम्हाला त्यांच्याशी नीट बोलताही येत नाही. आमची आई स्वतः आमची काळजी घेऊ शकत नाही. ते लवकर यावा अशी आमची इच्छा आहे, जेणेकरून आम्ही आनंदाने जगू शकू'.

तालिबानकडूनही जीवाला धोका : प्रोफेसर जोसेफ म्हणाले की, रहमानीच्या वतीने विद्यापीठाने केरळ सरकारला विनंती पाठवली होती, ज्यांनी केंद्राला पोलिस पडताळणीनंतर व्हिसा देण्याची शिफारस केली होती. रहमानी यांच्या पत्नीने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचीही भेट घेतली होती. जोसेफ म्हणाले, 'पण भारत सरकारकडून यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, रहमानी तालिबानकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.