ETV Bharat / international

Japan PM Kishida News : जपानच्या पंतप्रधानांच्या सभेत अज्ञाताने फेकला स्मोकबॉम्ब, थोडक्यात वाचले प्राण - जपान पंतप्रधान किशिदा

पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या रॅलीमध्ये अज्ञाताने स्मोक बॉम्ब फेकला. या हल्ल्यात सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान किशिदा यांना सुरक्षित ठिकाणी नेले.

Japan PM Kishida New
पंतप्रधान फुमियो किशिदा
author img

By

Published : Apr 15, 2023, 10:28 AM IST

टोकियो : सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारासोबत पंतप्रधान बोलत असताना स्मोकबॉम्ब फेकल्यानंतर एकच गोंधळ उडाला. जपानच्या माध्यमांच्या माहितीनुसार पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या भेटीदरम्यान जपानी बंदरात मोठा स्फोट झाला आहे. परंतु कोणतीही दुखापत झाली नाही.

जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो यांना अजिबात जखमी झाली नाही. भाषण देण्याआधी तेथे मोठा स्फोट ऐकू आल्यानंतर त्यांनी पश्चिम जपान बंदर सोडल्याची माहिती समोर येत आहे. किशिदा हे शनिवारी सकाळी वाकायामा प्रांतातील सायकाझाकी बंदराला भेट देत असताना ही घटना घडली आहे.

जपान सरकारने शुक्रवारी ओसाका शहरात देशातील पहिले कॅसिनो उघडण्याच्या वादग्रस्त योजनेला मंजुरी दिली. या योजनेमुळे परदेशी पर्यटकांना अधिक आकर्षित करण्याचा जपान सरकारचा प्रयत्न आहे. ओसाका वर्ल्ड एक्स्पो आयोजित केल्यानंतर कॅसिनो चार वर्षांनी खुला होणार आहे. कॅसिनो रिसॉर्टमध्ये कॉन्फरन्स सुविधा, प्रदर्शन हॉल, हॉटेल आणि एक थिएटर असणार आहे. ओसाका-कानसाई एक्स्पोनंतर स्थानिक अर्थव्यवस्थेत आणि संपूर्ण जपानच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासह पर्यटन केंद्र होईल, अशी अपेक्षा किशिदा यांनी केली.

माजी पंतप्रधान आबे यांची सभेदरम्यान गोळ्या झाडून हत्या- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची जुलै २०२३ मध्ये सभेदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा हत्यारा हा माजी नौदल कर्मचारी होता. आबे यांचा हत्यारा हा त्यांचे सुरक्षाकवच भेदून आलाच कसा सवाल उपस्थित करण्यात आला होता. आबे यांनी २०२० मध्ये प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला होता. ते जपानमधील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते.

हत्येचे कारण अद्याप रहस्यच- मारेकऱ्याने पळून जाण्याचा किंवा पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आबेंची राजकीय विचारसरणी आणि धोरणे या कारणामुळे हत्या झाली नसावी, असे जपानच्या पोलिसांनी म्हटले होते. त्यामुळे हत्या नेमकी कुठल्या कारणासाठी झाली याचा आजतागायत उलगडा होऊ शकलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत शिंजो आबे यांच्याशी असलेल्या मैत्रीचे स्मरण करत त्यांचे वर्णन जपानचे उत्कृष्ट नेते असा केला होता. आबे हे एक महान जागतिक राजकारणी आणि महान दूरदृष्टी असल्याचे नेते असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

हेही वाचा-Apple CEO Visit in India : अ‍ॅपलचे सीईओ भारतात करणार अ‍ॅपलच्या रिटेल स्टोअर्सचे अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.