देर अल-बालाह (गाझा पट्टी) Israel Hamas war : पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी युद्धविरामाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय आवाहनांवर वक्तव्य केलंय. गाझातील हमास अतिरेक्यांनी 239 ओलितांना सोडलं तरच युद्धविरामाचा विचार करता येइल, असं ते म्हणाले. तसंच हमासला चिरडण्यासाठी इस्रायलची लढाई पूर्ण शक्तीनं सुरू राहणार असल्याचं देखील नेतान्याहू यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात सांगितलं.
इस्रायलचा लढा 'पूर्ण ताकदीनं' सुरू : इस्रायलनं गाझा पट्टीच्या सर्वात मोठ्या रुग्णालयाजवळ शनिवारी रात्री तसंच रविवारी सकाळी हवाई हल्ले केले. तत्पूर्वी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी युद्धविरामाचं वाढते आंतरराष्ट्रीय आवाहन नाकारलंय. गाझा पट्टीतील हमासच्या अतिरेक्यांना चिरडण्याचा इस्रायलचा लढा 'पूर्ण ताकदीनं' सुरू राहील, असं ते म्हणाले.
हमासची 16 वर्षांची सत्ता संपुष्टात : इस्रायलनं हमासची गाझामधील 16 वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे. या प्रदेशात अडकलेल्या 23 लाख पॅलेस्टिनींवर युद्धाचा परिणाम झाल्यामुळं त्यांनी हमासच्या अतिरेक्यांना जबाबदार धरलं आहे. युद्ध सहाव्या आठवड्यात प्रवेश करत असताना, तात्पुरत्या युद्धबंदीसाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. शनिवारी सौदी अरेबियात 57 देशांतील मुस्लिम, अरब नेत्यांच्या बैठकीत युद्ध थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं. त्याच वेळी, सुमारे 3 लाख पॅलेस्टाईन समर्थक निदर्शकांनी लंडनमध्ये शांततेनं मोर्चा काढला. इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून हा सर्वात मोठा मोर्चा होता.
गाझा ताब्यात घेण्यास विरोध : नेतन्याहू यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, युद्धानंतर गाझात निशस्त्रीकरण केलं जाईल. इस्रायल या क्षेत्रावरील सुरक्षा नियंत्रण ताब्यत घेईल. इस्त्रायलनं हा परिसर पुन्हा ताब्यात घेण्याला आपला विरोध असल्याचं अमेरिकेनं म्हटले होतं. मात्र नेतन्याहू यांनी गाझा ताब्यात घेणार असल्याचं पुन्हा एकदा वक्तव्य केलंय.
हेही वाचा -