वॉशिंग्टन Israel Hamas War : संयुक्त राष्ट्र आणि इतर संस्थांकडून मानवतावादी मदत पाठवण्याची परवानगी देण्यासाठी इस्रायल उत्तर गाझाच्या निवडक भागात लष्करी कारवायांमध्ये दररोज 4 तासांचा युद्धविराम सुरू करणार आहे. व्हाईट हाऊसनं गुरुवारी याची घोषणा केली. व्हाईट हाऊसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युद्धानं वेढलेल्या भागात मानवतावादी मदत पोहोचवणे आणि नागरिकांना युद्ध क्षेत्रातून पळून जाण्याची परवानगी देणे हा या विरामाचा उद्देश आहे.
योग्य दिशेनं एक पाऊल : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितलं की, इस्रायल युद्धविरामाची वेळ तीन तास अगोदर जाहीर करेल. 'योग्य दिशेनं एक पाऊल' असं या निर्णयाचं वर्णन करताना किर्बी म्हणाले, इस्रायली लोकांनी आम्हाला सांगितलंय की स्थगन कालावधीत या भागात कोणतीही लष्करी कारवाई होणार नाही तसंच ही प्रक्रिया आजपासून सुरू होईल. मानवतावादी मदत मिळू शकेल आणि लोक सुरक्षितपणे बाहेर पडू शकतील याची खात्री करण्यासाठी प्रशासनानं चार तासांच्या थांब्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या युद्धविरामामुळं हमासनं ओलीस ठेवलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची संधी मिळेल असंही किर्बी म्हणाले.
दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तूंची तीव्र टंचाई : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील तीव्र चर्चेनंतर वेढलेल्या भागात दररोज मानवतावादी विराम लागू करण्याच्या इस्रायली निर्णयाचं वर्णन 'महत्त्वाचं' पहिलं पाऊल म्हणून करण्यात आलंय. आम्ही इस्रायलींना नागरी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि ती संख्या कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन करत आहोत, असं किर्बी म्हणाले. इस्रायल उत्तरेकडील लक्ष्यांवर हल्ले करत असल्यानं नागरिकांना दक्षिण गाझामध्ये जाण्याचा वारंवार इशारा देण्यात आलाय. परंतु, दक्षिण गाझा देखील त्यांच्यासाठी सुरक्षित क्षेत्र नाही आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तूंची तीव्र टंचाई आहे. युद्ध सुरू झाल्यापासून नागरिक मोठ्या प्रमाणात गाझा सोडू शकले नाहीत.
आतापर्यंत 12 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू : इस्रायली अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर गाझात एक महिन्यापेक्षा जास्त काळ युद्ध सुरू आहे. यात आतापर्यंत 1,400 हून अधिक लोक मारले गेले. त्यापैकी बहुतेक सर्व सामान्य लोक होते. तसंच 239 जणांना ओलीस ठेवलंय. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय की गाझामधील हमासचा नाश करण्यासाठी इस्रायलच्या प्रति-सैन्य मोहिमेत बहुतेक नागरिकांसह 10,600 लोक मारले गेले आहेत.
हेही वाचा :