ETV Bharat / international

Israel Hamas War : इस्रायलची ताकद वाढणार! जो बायडेन पाठोपाठ ऋषी सुनक इस्रायलला देणार भेट - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक

Israel Hamas War : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्या पाठोपाठ युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक आज इस्रायलला भेट देणार आहेत. यामुळं इस्रायलची ताकद वाढणार आहे.

Israel Hamas War
Israel Hamas War
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 9:03 AM IST

लंडन Israel Hamas War : युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक आज इस्रायलला भेट देऊन इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत इस्रायली नेत्यांशी चर्चा करणार आहेत. सुनक यांच्या कार्यालयानं सांगितलं की, ते इस्रायलच्या पाठीशी आहेत. हा पाठिंबा इस्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार सुनक इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांची भेट घेणार आहेत. ते भेटीदरम्यान 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि गाझामध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल चर्चा करणार आहेत.

गाझाच्या रुग्णालयावरील हल्ल्याचा निषेध : माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनक यांनी त्यांच्या भेटीपूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, प्रत्येक नागरिकाचा मृत्यू ही शोकांतिका आहे. हमासच्या भीषण दहशतवादी कृत्यानंतर अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. ब्रिटनचे पंतप्रधान सुनक शक्य तितक्या लवकर गाझामध्ये मानवतावादी मदत देण्यास आणि गाझामध्ये अडकलेल्या ब्रिटीश नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. दौऱ्यापुर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पुर्वीचं ट्विटर) वर एका पोस्टमध्ये, सुनक यांनी गाझाच्या रुग्णालयावरील हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात शेकडो लोक मारले गेले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, अल अहली अरब हॉस्पिटलमधील दृश्यांनी आम्ही सर्वजण हैराण झालो आहोत. युद्ध दिवसेंदिवस अधिक क्रूर होत असल्यानं दोन्ही बाजूंची हजारो लोक मारली गेली आहेत.

हमासच्या गडांना लक्ष्य करतो : जसजसे युद्ध सुरू होते, तत्काळ युद्धबंदीसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. दीर्घकाळ चालत असलेल्या इस्रायली-पॅलेस्टिनी संघर्षाचे निराकरण करण्यासाठी वाटाघाटीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी, इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांचे प्रवक्ते ताल हेनरिक यांनी माध्यमांना सांगितले की इस्रायली सेना रुग्णालयांना लक्ष्य करत नाही. ते म्हणाले की, आम्ही फक्त हमासचे अड्डे शस्त्रांचे डेपो आणि दहशतवादी तळांना लक्ष्य करतो.

  • We are all shocked by the scenes at the al-Ahli Arab Hospital.

    Our intelligence services are rapidly analysing the evidence to independently establish the facts. pic.twitter.com/qUTVPvUoBa

    — Rishi Sunak (@RishiSunak) October 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात अमेरिकेची उडी, राष्ट्रध्यक्ष जो बायडन इस्रायलला जाणार

Israel Hamas War : गाझातील रुग्णालयावरील हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू, हल्ला केला नसल्याचं इस्त्रायलच्या पंतप्रधानांचा दावा

Palestinian Israeli Conflict : हमास-इस्रायल युद्धात रशियाची उडी; स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याची व्लादिमीर पुतीन यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.