शिकागो Israel-Hamas Hate Crime : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात एक घृणास्पद घटना घडलीय. अमेरिकेतील इलिनॉयमध्ये एका 71 वर्षीय व्यक्तीनं 6 वर्षांच्या मुलाची चाकूनं भोसकून हत्या केलीय. याशिवाय त्यानं एका 32 वर्षीय महिलेलाही गंभीर जखमी केलंय. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा बदला म्हणून त्यानं पीडितांची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
हिंसाचारा संदर्भात पोलीस सतर्क : अलीकडच्या काही दिवसांत, अमेरिकन शहरांमधील पोलीस आणि फेडरल अधिकारी सेमिटिक किंवा इस्लामोफोबिक भावनांनी प्रेरित झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात अधिक सतर्क आहेत. ज्यू आणि मुस्लिम गट देखील सोशल मीडियावर द्वेषपूर्ण आणि धमकी देणारे वक्तृत्व पसरवत आहेत. अशातच महिला आणि मुलाचा मृतदेह सकाळी दक्षिण-पश्चिम प्लेनफिल्ड टाउनशिपच्या एका अनकॉर्पोरेटेड भागातील एका घरात आढळून आल्याचं विल काउंटी शेरीफ कार्यालयानं सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात म्हटलंय. त्यानंतर रुग्णालयात मुलाला दाखल करण्यात आलं. मात्र त्या मुलाला मृत घोषित करण्यात आलं.
हमास इस्रायल संघर्षामुळं संशयिताच कृत्य : पोलिसांच्या माहितीनुसार महिलेवर अनेक वेळा वार करण्यात आले होते. तर मुलाच्या शवविच्छेदनात त्याच्यावर डझनभर वार करण्यात आल्याचे समोर आलंय. शेरीफच्या निवेदनात म्हटलंय की, या क्रूर हल्ल्यातील दोघंही हे मुस्लिम असल्यामुळं आणि मध्य पूर्वेतील हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळं संशयितानं हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. विल काउंटी शेरीफच्या कार्यालयाच्या मते, महिलेनं 911 वर कॉल केला की तिच्या घरमालकानं तिच्यावर चाकूनं हल्ला केला. त्यानंतर ती बाथरूममध्ये जाऊन त्याच्याशी लढत राहिली. या हल्ल्यातील संशयित व्यक्तीच्या कपाळावर जखमेच्या खुणा झालेल्या दिसल्या, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार- रविवारी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मृत मुलाचं नाव अल-फयुम असं असून तो पॅलेस्टिनी-अमेरिकन मुलगा आहे. संस्थेनं दुसऱ्या पीडितेची ओळख मुलाची आई म्हणून केली. पॅलेस्टिनी-अमेरिकन हॅनन म्हणाले, "आम्ही प्राणी नाही, आम्ही माणसं आहोत. लोकांनी आम्हाला माणूस म्हणून पाहावं, माणसासारखं वाटावं, आम्हाला माणसांसारखं वागवावं, कारण आम्ही तेच आहोत.
हेही वाचा :
- Indian origin killed in Hamas attack : हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या दोन इस्रायली महिला सुरक्षा अधिकारी ठार
- Israel Hamas War : इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा प्रमुख ठार, पॅलेस्टिनी नागरिकांचं दक्षिण गाझाकडे स्थलांतर
- Palestinian Israeli Conflict : हमास-इस्रायल युद्धात रशियाची उडी; स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याची व्लादिमीर पुतीन यांची मागणी