ETV Bharat / international

इस्रायल हमासमध्ये तात्पुरती युद्धबंदी; इस्रायलच्या मंत्रिमंडळानं दिली मंजुरी, इराणची इस्रायलवर टीका - इस्रायल मंत्रीमंडळ

Israel Hamas conflict : हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात तात्पुरती युद्धबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायलच्या मंत्रिमंडळानं हमास आणि इस्रायलमध्ये होणाऱ्या तात्पुरत्या युद्धबंदीला मान्याता दिली आहे.

Israel Hamas conflict
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 11:58 AM IST

जेरुसलेम Israel Hamas conflict : पॅलेस्टाईन आणि इस्राईल या दोन देशात युद्ध सुरू आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या नागरिकांना बंदी बनवल्यानं हे युद्ध आणखी भडकलं आहे. मात्र आता हमास आणि इस्रायलमध्ये 50 नागरिकांच्या सुटकेपर्यंत युद्धबंदी करण्यात आली आहे. इस्रायलच्या मंत्रिमंडळानं बुधवारी हमाससोबत केलेल्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सहा आठवड्यांपासून सुरू असलेलं हे युद्ध काही काळ थांबणार आहे.

गाझामधील 240 पैकी 50 ओलिसांची करणार सुटका : गाझा पट्टीत इस्रायलचे 240 नागरिक बंदिस्त आहेत. त्यापैकी हमास 50 ओलिसांची सुटका करणार आहे. यासाठी इस्रायल सरकारनं हमासनं ओलिस ठेवलेल्या 240 नागरिकांपैकी 50 नागरिकांची सुटका करण्यासाठी युद्धविराम करण्याचा करार केला आहे. या करारानुसार एका दिवशी 10 ओलिसांची हमास सुटका करणार आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये येणाऱ्या ओलिसांमुळे युद्धबंदी राहणार आहे. इस्रायली सरकारनं बुधवारी या कराराला मंजुरी दिली आहे. अगोदर महिला आणि मुलांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती इस्रायल सरकारनं यावेळी दिली आहे.

इस्रायल हमासविरुद्ध पुन्हा करणार आक्रमण : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यांना माहिती दिली. युद्धविरामानंतर इस्रायल पुन्हा हमासविरोधात युद्ध सुरू करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र ही युद्धबंदी कधीपासून करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही. मंगळवारी रात्री हमासबरोबर युद्धबंधी करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. ही बैठक बुधवारी पहाटेपर्यंत चालली. यावेळी हमाससोबत युद्धबंदी करण्याबाबतची संवेदनशिलता पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केली.

युद्धबंदी ही केवळ रणनिती : पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या मंत्र्यांना तात्पुरती युद्धविराम हा रणनितीचा भाग आहे. युद्धविराम संपल्यानंतर पुन्हा युद्ध सुरू ठेवणार असल्याचं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आश्वासन दिलं आहे. सर्व नागरिकांची सुटका होईपर्यंत युद्धबंदी केली जाणार नसल्याचं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यावेळी स्पष्ट केलं. या बैठकीला वरिष्ठ सरकारी अधिकारीही उपस्थित होते. युद्धविरामाच्या काळात गुप्तचर यंत्रणा आपलं काम करत राहणार आहेत. युद्धाच्या पुढील टप्प्यात सैन्याला त्यामुळे आणखी तयारी करता येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. उत्तर गाझामधील रुग्णालयांच्या आसपास इस्रायली सैन्यानं हमासच्या दहशतवाद्यांशी लढा दिल्यानं हा करार करण्यात आला आहे.

इराणची इस्रायलवर टीका : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी इस्रायलवर जोरदार टीका केली आहे. इस्रायल-हमास युद्धावरील विशेष ब्रिक्स बैठकीला संबोधित करताना इराणचे इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी ही टीका केली आहे. त्यांनी झिओनिस्ट राजवटीला गुन्हेगार असल्याचं म्हटलं आहे. पश्चिमेच्या अन्यायी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं स्पष्ट लक्षण असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. गाझाचा मुद्दा हा मानवता आणि न्यायाचा मुद्दा आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. इस्रायलनं मानवता, नैतिकता आणि अधिकारांचं उल्लंघन केलं आहे. ते चुकीची माहिती पसरवून जनमताची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही रायसी यावेळी म्हणाले.

हेही वाची :

  1. हमास-इस्रायल संघर्षात नागरिकांच्या हत्येचा तीव्र निषेध करतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. इस्रायल-हमास संघर्षाचे दीड महिने; युद्धात 13000 हून अधिक पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.