तेल अवीव (इस्रायल) Israel Hamas Conflict : हमासनं शनिवारी पहाटे गाझा पट्टीत इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ला केला. यामध्ये सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला, तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले. इस्रायलच्या हद्दीत हमासच्या अनेक सैनिकांनी घुसखोरी केली. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. तसेच शत्रूला मोठी किंमत चुकवावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
-
More than 200 killed in Hamas attack on Israel
— ANI Digital (@ani_digital) October 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/GU6Y2ElkIR#Israel #Hamas #Attack #attackonisrael pic.twitter.com/5EtF7rCZde
">More than 200 killed in Hamas attack on Israel
— ANI Digital (@ani_digital) October 7, 2023
Read @ANI Story | https://t.co/GU6Y2ElkIR#Israel #Hamas #Attack #attackonisrael pic.twitter.com/5EtF7rCZdeMore than 200 killed in Hamas attack on Israel
— ANI Digital (@ani_digital) October 7, 2023
Read @ANI Story | https://t.co/GU6Y2ElkIR#Israel #Hamas #Attack #attackonisrael pic.twitter.com/5EtF7rCZde
200 हून अधिक पॅलेस्टिनी ठार : इस्रायलच्या ऑपरेशन 'आयर्न स्वॉर्ड्स' अंतर्गत प्रत्युत्तरात 230 हून अधिक पॅलेस्टिनी ठार, तर 1 हजार 610 लोक जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये अतिरेक्यांच्या घुसखोरीनंतर नेतन्याहू यांनी आपल्या दूरचित्रवाणी भाषणात हमासला गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचं म्हटलं आहे.
हमासचा नाश करणार : इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, सुरक्षा मंत्रिमंडळानं हमास, इस्लामिक जिहादला नष्ट करण्याच्या निर्णयांना मान्यता दिली आहे. त्यामुळं हमासला नेस्तनाबूत केलं जाईल.
इस्रायलचा हमास विरोधात लढा सुरू: इस्रायलचे सैन्य अजूनही दक्षिणेच्या काही भागात हमासशी लढत आहे. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, आम्ही आमच्या नागरिकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
इस्रायलवर-हमासमुळं तणाव वाढण्याची भीती : इस्रायल-पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात प्राणघातक युद्ध सुरू आहे. दोघंही एकमेकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. त्यामुळं या हल्याचा परिणाम इतर देशावर देखील होण्याची शक्यता आहे.
20 मिनिटांत इस्रायलवर 5000 क्षेपणास्त्रे डागली : हमास या दहशतवादी संघटनेनं शनिवारी सकाळी सर्वप्रथम गाझा पट्टीतून इस्रायलवर प्रचंड रॉकेट हल्ला केला. हमासच्या दहशतवाद्यांनी अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5000 क्षेपणास्त्रे डागली. यावेळी त्यांनी इस्त्रायली शहरांना लक्ष्य केलं. या हल्ल्यांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. इस्रायल, पॅलेस्टाईन आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. याआधीही दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. या संघर्षात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, इस्रायल, हमास जेव्हा-जेव्हा आमनेसामने आले आहेत, तेव्हा पॅलेस्टाईनचा पराभव झाला आहे.
हेही वाचा :