ETV Bharat / international

भारत सरकारचा मोठा निर्णय, कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा केली पूर्ववत - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो

Canada Visa : भारतानं सुमारे दोन महिन्यांनंतर कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पूर्ववत केली आहे. कॅनडानं खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर भारतानं व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली होती.

India Canada row
India Canada row
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 4:56 PM IST

नवी दिल्ली Canada Visa : जवळपास दोन महिन्यांनंतर भारतानं कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पूर्ववत केली. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येत भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर दोन देशांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे.

व्हिसा सेवा का बंद केली : सप्टेंबरमध्ये, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ब्रिटिश कोलंबियामध्ये १८ जून रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केला होता. यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध तणावपूर्ण झाले. भारतानं २०२० मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केलं होतं. यानंतर भारतानं कॅनडाची ई-व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली होती. तर कॅनडा सरकारनंही भारतात प्रवास करत असलेल्या आपल्या नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

भारतानं आरोप फेटाळून लावले : पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत बोलताना हे आरोप केले होते. तसंच या आरोपांना समर्थन देणारे पुरावेही आमच्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. भारत सरकारनं पंतप्रधान ट्रुडो यांचे आरोप मूर्खपणाचे ठरवून फेटाळून लावले. याच्या काही दिवसांनंतर भारतानं जाहीर केलं की, ते कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करत आहेत. तसंच भारतानं कॅनडाला आपल्या मुत्सद्दींची संख्या कमी करण्यासही सांगितलं होतं. भारतानं कॅनडाला आपल्या भूमीतून कार्यरत दहशतवादी आणि भारतविरोधी घटकांवर कठोर कारवाई करण्यास सांगितलं होतं.

एस जयशंकर यांचं प्रत्युत्तर : ब्रिटनच्या दौऱ्यात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं होतं की, "जर तुम्ही असे आरोप करत असाल तर कृपया त्याचे पुरावे शेअर करा. आम्ही याचा तपास करण्यास नकार देत नाही". कॅनडानं आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा भारताशी शेअर केलेला नाही, असं जयशंकर म्हणाले होते.

हेही वाचा :

  1. India Canada Row : एस जयशंकर यांचं जस्टिन ट्रूडोंना जोरदार प्रत्युत्तर; निज्जरच्या हत्येत भारताच्या सहभागाचे मागितले पुरावे
  2. India Canada Row : 'आमच्या मातीत येऊन केली कॅनडाच्या नागरिकाची हत्या'; निज्जरच्या हत्येवरुन जस्टिन ट्रूडोंचा पुन्हा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.