वॉशिंग्टन डी. सी - जगभरात कोरोनाचा प्रसार झाला असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 11 हजार 696 कोरोना रुग्ण आढळले असून 3 हजार 889 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, ब्राझिल, भारत या देशांमध्ये सर्वांत जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत आहे. जगभरामध्ये एकूण 1 कोटी 82 लाख 37 हजार 573 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 6 लाख 92 हजार 851 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 14 लाख 47 हजार 153 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
अमेरिकेमध्ये 48 हजार 13 लाख 647 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 लाख 58 हजार 365 जणांचा बळी गेला आहे. तर ब्राझिलमध्ये 27 लाख 33 हजार 677 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 94 हजार 130 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारत असून भारतामध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 52 हजार 972 कोरोना रुग्ण सापडले असून 771 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 18 लाख 3 हजार 696 वर पोहोचली आहे.