नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या भेटीदरम्यान भारत अमेरिका संरक्षण सहकार्यातील एक महत्त्वाचा करार झाला आहे. अमेरिकेच्या विमान इंजिन पुरवठादार असेलेल्या जीई एरोस्पेसने गुरुवारी भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भारतीय वायुसेनेच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA)-Mk-II - तेजससाठी संयुक्तपणे लढाऊ जेट इंजिन तयार करणार आहे.
ओहायो येथे आहे जीई कंपनीचे मुख्यालय : करारामध्ये भारतातील GE एरोस्पेसच्या F414 इंजिनांचे संभाव्य संयुक्त उत्पादन समाविष्ट आहे. जीई एरोस्पेस या कंपनीचे ओहायो येथे मुख्यालय आहे. जीई एरोस्पेस कंपनीने आवश्यक निर्यात अधिकृतता प्राप्त करण्यासाठी ती अमेरिकन सरकारसोबत काम करत असल्याचे स्पष्ट केले. हा प्रयत्न IAF च्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LAC) Mk2 कार्यक्रमाचा एक भाग असल्याचेही यावेळी कंपनीच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
भारत अमेरिकेतील हा ऐतिहासिक करार : भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी एचएएलसोबत सामंजस्य करार हा महत्त्वाचा घटक आहे. भारत आणि HAL सोबतच्या आमच्या दीर्घकालीन भागीदारीमुळे हा एक ऐतिहासिक करार असल्याचे GE चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरेन्स कल्प ज्युनियर यांनी यावेळी स्पष्ट केले. आमची F414 इंजिने अतुलनीय असून दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी फायदेशीर आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या लष्करी ताफ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उच्च दर्जाचे इंजिन तयार करण्यात मदत करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चार दशकांहून अधिक काळ भारतात कार्यरत : जीई एरोस्पेस ही कंपनी चार दशकांहून अधिक काळ भारतात कार्यरत आहे. या कंपनीने 1986 मध्ये F404 इंजिनांसह LCA चा विकास करण्यासाठी भारताच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि HAL सोबत काम करण्यास सुरुवात केली. कंपनीची F404 आणि F414 इंजिन सध्या LCA Mk1 आणि LCA Mk2 प्रोग्रामचा भाग आहेत. एकूण 75 F404 इंजिने कंपनीने वितरित केली आहेत. आणखी 99 LCA Mk1A साठी ऑर्डरवर आहेत. LCA Mk2 साठी चालू असलेल्या विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून आठ F414 इंजिन वितरित करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
हेही वाचा -