एलमाऊ: विकसित अर्थव्यवस्थांच्या G-7 गटाची शिखर परिषद मंगळवारी पार ( The G-7 summit ended on Tuesday ) पडली. ज्यामध्ये युक्रेनच्या भविष्यासाठी दीर्घकालीन वचनबद्धतेचे संकेत दिले आणि रशियाला आक्रमकतेची मोठी किंमत चुकवण्यास भाग पाडण्याचे वचन दिले.
यासोबतच जागतिक भूकबळीचे संकट संपुष्टात ( Discussion on the global hunger crisis ) आणण्यासाठी आणि हवामान बदलाविरोधात एकता दाखविण्याचा प्रयत्न या परिषदेने केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( President of Ukraine Volodymyr Zhelensky ) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केल्यानंतर युनायटेड स्टेट्स, जर्मनी, फ्रान्स, इटली, ब्रिटन, कॅनडा आणि जपानने सोमवारी युक्रेनला शक्य तितक्या काळ पाठिंबा देण्याचे वचन दिले.
परिषदेदरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते रशियन तेलाच्या किंमतीवर लगाम ( Curb the price of Russian oil ) घालण्याची, रशियन वस्तूंवरील कर दर वाढवण्याची आणि नवीन निर्बंध लादण्याची योजना आखत आहेत. बव्हेरियाच्या आल्प्स पर्वतातील श्लोस एल्माऊ हॉटेलमधून, G-7 सदस्य देशांचे नेते माद्रिदमध्ये नाटोच्या बैठकीत उपस्थित राहतील जेथे युक्रेनचा मुद्दा पुन्हा वरचढ होण्याची अपेक्षा आहे. जपान वगळता G-7 गटातील सर्व सदस्य नाटोचे सदस्य आहेत आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना माद्रिदला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
हेही वाचा - अमेरिका : ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये सापडले ४६ मृतदेह, उडाली खळबळ