तेल अवीव (इस्रायल) Former Video Journalist Yaniv Zohar killed : माजी पत्रकार यानिव जोहर यांचा पत्नी आणि दोन मुलींसह 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या रक्तरंजित हल्ल्यादरम्यान त्यांच्या घरातच मृत्यू झालाय. गेली तीन दशकं त्यांनी आपल्या मूळ देशातील युद्ध आणि हिंसाचाराच्या प्रमुख बातम्या कव्हर केल्या आहेत.
15 वर्ष केल काम : झोहर यांनी आंतरराष्ट्रीय न्यूज एसन्सीकरिता इस्रायल ब्युरोसाठी 2005 ते 2020 असं 15 वर्षे काम केले. यादरम्यान त्यांनी देशातील अनेक प्रमुख बातम्यांचा कव्हर केल्या. परंतु, गाझा पट्टीच्या सीमेजवळील नहल ओझ किबुट्झमध्ये युद्ध असताना त्यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झालं होतं. जोहर हे बहुतेक वेळा हिंसाचाराची बातमी देणारे तसंच घटनास्थळी पोहोचणारे पहिले पत्रकार अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती.
असोसिएटेड प्रेसचे डोळे आणि कान म्हणून प्रसिद्ध : 2005 मध्ये गाझामधून इस्रायलनं माघार घेतल्याच्या कव्हरेजमध्ये ते मुळापर्यंत गेले होते. तसंच पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी इस्रायली सैनिक गिलाड शालिटचे अपहरण केल्याच्या घटनास्थळावरही पोहोचणारे ते पहिले वार्ताहर होते. यानिव हे दक्षिण इस्रायलमधील आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीचे डोळे आणि कान म्हणून प्रसिद्ध होते. या प्रदेशातील बातम्या ते नेहमीच पहिल्यांदा देत होते असं आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीचे कार्यकारी संपादक ज्युली पेस यांनी सांगितलं.
कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू : गाझामधून कमीतकमी 2,000 हमास अतिरेक्यांनी घुसखोरी केली. देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वात घातक हल्ल्यात 1,400 हून अधिक इस्रायली नागरिकांना ठार करण्यात आलं. अशाच हल्ल्यात जोहर, त्यांची पत्नी यास्मिन आणि त्यांच्या दोन मुली तेहेलेट, केशेत यांचा मृत्यू झाला. जोहर यांचा 13 वर्षांचा मुलगा एरियल, जो पहाटे जॉगींगसाठी गेला होता. सुदैवानं तो जिवंत बचावला. यास्मिन यांचे वडील हैम लिव्हणे यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.
हेही वाचा :
- Israel Hamas War : गाझातील रुग्णालयावरील हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू, हल्ला केला नसल्याचं इस्त्रायलच्या पंतप्रधानांचा दावा
- Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात अमेरिकेची उडी, राष्ट्रध्यक्ष जो बायडन इस्रायलला जाणार
- Israel Hamas War : युद्धाचा आठवा दिवस; गाझाच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलच्या आवारात जमले हजारो लोकं