वॉशिंग्टन : लॉस एंजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटी यांची अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एरिक गार्सेटी यांना शपथ दिली. गार्सेटी यांनी शपथ घेताना म्हटले की, 'मी शपथ घेतो की मी सर्व परदेशी आणि देशांतर्गत शत्रूंविरुद्ध युनायटेड स्टेट्सच्या राज्यघटनेचे समर्थन आणि रक्षण करीन. अमेरिकेच्या राज्यघटनेप्रती माझी खरी निष्ठा आणि विश्वास असेल'.
-
Eric Garcetti sworn in as US Ambassador to India
— ANI (@ANI) March 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Ambassador Garcetti is a committed public servant and will play a critical role in strengthening our partnership with the people of India: Kamala Harris, US Vice-President pic.twitter.com/cmDYdKx3sV
">Eric Garcetti sworn in as US Ambassador to India
— ANI (@ANI) March 25, 2023
Ambassador Garcetti is a committed public servant and will play a critical role in strengthening our partnership with the people of India: Kamala Harris, US Vice-President pic.twitter.com/cmDYdKx3sVEric Garcetti sworn in as US Ambassador to India
— ANI (@ANI) March 25, 2023
Ambassador Garcetti is a committed public servant and will play a critical role in strengthening our partnership with the people of India: Kamala Harris, US Vice-President pic.twitter.com/cmDYdKx3sV
52 विरुद्ध 42 मतांनी विजय मिळवला : शपथविधीनंतर कमला हॅरिस यांनी गार्सेटी यांचे भारतात अमेरिकेचे नवे राजदूत झाल्याबद्दल अभिनंदन केले. 15 मार्च रोजीच अमेरिकन संसदेने लॉस एंजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटी यांची अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून पुष्टी केली होती. गार्सेटी यांनी 52 विरुद्ध 42 मतांनी विजय मिळवला आहे. अमेरिकन सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीने देखील या लॉस एंजेलिसच्या माजी महापौरांना भारताचे राजदूत होण्यासाठी त्यांच्या बाजूने मतदान केले. रिपब्लिकन सिनेटर्स टॉड यंग आणि बिल हेगर्टी यांनी समितीच्या सर्व डेमोक्रॅटमध्ये गार्सेटींच्या बाजूने मतदान केल्यानंतर पॅनेलने 13 - 8 मतांनी त्यांचे नामांकन मंजूर केले.
'भारतातील आमच्या हितांचे रक्षण करणार' : शपथ घेतल्यानंतर एरिक गार्सेटी म्हणाले की, 'भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत बनून मला खूप आनंद होत आहे. भारतात हे पद बरेच दिवस रिक्त होते. इथून आता माझा नवा प्रवास सुरू झाला आहे'. गार्सेटी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष बायडन आणि व्हाईट हाऊसने त्यांच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी त्यांचे नेहमीच ऋणी राहीन. मी भारतातील आमच्या महत्त्वाच्या हितांचे प्रतिनिधित्व करणार असून त्यासाठी मी सर्वदृष्टीने तयार आणि उत्सुक आहे. युनायटेड स्टेट्स - इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम आणि यूएस - इंडिया बिझनेस कौन्सिलने गार्सेटींची भारतातील नवे राजदूत म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.