हैदराबाद - गुगलचे सहसंस्थापक आणि अब्जाधीश सेर्गे ब्रिन यांच्या पत्नीसोबत त्यांचे अफेअर असल्याच्या वृत्ताचा टेस्लाचे सर्वेसर्वा एलोन मस्क यांनी इन्कार केला आहे. सर्जी आणि आपण मित्र आहोत आणि काल रात्री एकत्र पार्टीत होतो! मी निकोलला तीन वर्षांत फक्त दोनदाच पाहिले आहे, दोन्ही वेळा आजूबाजूच्या अनेक लोकांसोबत. काहीही रोमँटिक नाही, असे मस्क यांनी ट्विट केले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये मात्र ब्रिन यांच्या पत्नी निकोल शानाहान यांच्याशी मस्क यांचे कथित संबंध होते असे वृत्त दिले आहे.
अफेअर होईपर्यंत जवळचे मित्र - मस्क आणि मिस्टर ब्रिन हे अफेअर होईपर्यंत जवळचे मित्र होते, असेही त्या वृत्तामध्ये म्हटले आहे. ब्रिन यांनी जानेवारीमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, तसेच शानाहानपासून 15 डिसेंबर 2021 पासून वेगळे झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
आर्ट बेसलमध्ये आले संपर्कात - मस्क यांच्याशी शानहन यांचा संपर्क डिसेंबर २०२१ च्या सुरुवातीला मियामी येथील आर्ट बेसल इव्हेंटमध्ये झाला. आर्ट बेसल हा एक वार्षिक उत्सव आहे. जगभरातील श्रीमंतांना त्याचे आकर्षण असते. त्यावेळी एका पार्टीत मस्क यांनी ब्रिनसमोर गुडघे टेकून माफी मागितली, असेही त्यामध्ये म्हटले आहे. त्यावेळी उपस्थित लोकांनी ही माहिती दिल्याचे वृत्तामध्ये म्हटले होते.
मंदीच्या काळात केली होती मदत - ब्रिन हे टेस्ला कारचे उत्पादन सुरू झाल्यावर पहिल्या काही ग्राहकांपैकी एक होते. गुगलच्या सह-संस्थापकांनी २००८ मध्ये टेस्लाला यूएस सबप्राइम मॉर्टगेज संकटामुळे आलेल्या जागतिक मंदीच्या काळात 500,000 डॉलर्स दिले होते. कथित प्रकरण मस्क यांनी त्यांची मैत्रिणी, गायक ग्रिम्सशी ब्रेकअप केल्यानंतर कित्येक महिन्यांनंतर समोर आले.