लंडन - पूर्व लंडनमध्ये फ्लॅटच्या ब्लॉकवर आणि घरावर 20 मीटर क्रेन कोसळल्याने बुधवारी एका महिलेचा मृत्यू आणि चार जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही महिला मृत अवस्थेमध्ये आढळली आहे. तीचा क्रेन कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या चौघांना डोक्याला मार लागला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती बचावकार्य पथकाने दिली.दरम्यान घटनास्थळी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
महापौर सादिक खान यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेतून धडा घेऊन पुन्हा असा अपघात घडणार नाही, हे सुनिश्चित केले पाहिजे, असे ते म्हणाले.