ETV Bharat / international

ChatGPT powered Bing : चॅटजीपीटी आता लवकरच येणार डेस्कटॉपवर, मिळणार 'या' सुविधा - Windows

मायक्रोसॉफ्टने जगभरातील सुरुवातीच्या युजर्ससाठी चॅटजीपीटी डेस्कटॉपवर आणण्यास सुरुवात केली आहे. टेक जायंट Android आणि iOS साठी Bing.com च्या चॅट UI साठी 'बऱ्यापैकी ऑप्टिमाइझ्ड इंटरफेस' वर काम करत आहे. ज्यामध्ये सर्व-नवीन OpenAI समर्थित सामग्रीचा समावेश आहे, असे Windows च्या नवीनतम अहवालाचा हवाला देत सूत्रांनी सांगितले.

ChatGPT powered Bing
चॅटजीपीटी आता लवकरच येणार डेस्कटॉपवर
author img

By

Published : Feb 15, 2023, 5:53 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : ChatGPT बद्दल नवीन माहिती समोर आली आहे, मायक्रोसॉफ्ट लवकरच चॅटजीपीटी इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणार आहे. मायक्रोसॉफ्टने जगभरातील सुरुवातीच्या युजर्ससाठी डेस्कटॉपवर ChatGPT ची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. आणि येत्या काही आठवड्यात ते Android आणि iOS वर देखील उपलब्ध करुन देणार आहे. अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे. टेक जायंट Android आणि iOS साठी Bing.com च्या चॅट UI साठी 'बऱ्यापैकी ऑप्टिमाइझ्ड इंटरफेस' वर काम करत आहे. ज्यामध्ये सर्व-नवीन OpenAI समर्थित सामग्रीचा समावेश आहे, असे Windows च्या नवीनतम अहवालाचा हवाला देत सूत्रांनी सांगितले.

Bing ॲप डाउनलोड करा : युजर्सला पाठवलेल्या ईमेलमध्ये, मायक्रोसॉफ्टने पुष्टी केली की अहवालानुसार, मोबाईलवर अद्याप ही सुविधा उपलब्ध नाही. आम्ही अद्याप मोबाइलवर ChatGPT चा अनुभव देण्यास तयार नाही, मात्र आम्ही त्यावर सक्रियपणे काम करत आहोत आणि लवकरच ते देखील उपलब्ध करुन देवू, असे कंपनीने ईमेलमध्ये म्हटले आहे. तोपर्यंत, कृपया डेस्कटॉपवर नवीन ChatGPT चे नवे पर्याय उपलब्ध आहे आणि ते वापरणे सुरू ठेवा, आमच्या संपर्कात राहा. आणि मोबाइल ChatGPT तयार झाल्यावर तुम्ही आश्चर्यकारक अनुभवासाठी देखील, तुमच्या आवडत्या ॲप स्टोअरमधून Bing ॲप डाउनलोड करा.'

आणखी सुविधा उपलब्ध होणार : शिवाय, अहवालात असे म्हटले आहे की कंपनी अजूनही Bing.com AI UX ला मोबाइल फॉर्म फॅक्टरसाठी अनुकूल करत आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टने वर्ड, पॉवरपॉइंट आणि आउटलुक यांसारख्या मुख्य उत्पादकता ॲप्समध्ये आपले नवीन प्रोमिथियस मॉडेल सादर करण्याची योजना आखली आहे. सूत्रांनी, द व्हर्ज अहवालाचा हवाला देऊन सांगितले की, येत्या काही आठवड्यांमध्ये, मायक्रोसॉफ्ट ओपनएआयच्या भाषा, एआय तंत्रज्ञान आणि त्याच्या एआय मॉडेल्सना एकत्रित करण्यासाठी त्याच्या उत्पादकता योजनांची तपशीलवार माहिती देईल.

काटे की टक्कर : आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये मायक्रोसॉफ्टने आणलेल्या चॅटबॉटला टक्कर देत गुगलने आता आपली नवीन सेवा आणण्याची घोषणा केली आहे. गुगलने 'गुगल बार्ड' नावाने नवीन चॅटबॉट आणला असून, गुगल सर्चमध्येच ही सुविधा सर्वांना उपलब्ध होणार असल्याची घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये केली आहे. गुगलच्या या घोषणेमुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रांतील स्पर्धा अधिकच तीव्र होणार आहे.

हेही वाचा : ChatGPT Write Love Letters : प्रेमपत्र पाठवायला देखील आळस? 62 टक्के भारतीयांची लिहिण्याकरिता चॅटजीपीवर भिस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.