ETV Bharat / international

बांगलादेशात 'द बर्निंग ट्रेन'चा थरार! भारतीय सीमेजवळून जाणाऱ्या ट्रेनच्या चार डब्यांना आग - द बर्निंग ट्रेन

Burning Train in Dhaka : बांगलादेशातील गोपीबाग इथं इंटरसिटी बेनापोल एक्सप्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झालाय. या ट्रेनच्या चार डब्यांना काही समाजकंटकांनी आग लावली होती.

Burning Train in Dhaka
Burning Train in Dhaka
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 12:17 PM IST

बांगलादेशात 'द बर्निंग ट्रेन'चा थरार

ढाका Burning Train in Dhaka : भारताचं शेजारील राष्ट्र बांगलादेशची राजधानी ढाका इथं शुक्रवारी रात्री एका ट्रेनला आग लागून दोन मुलांसह किमान चार जणांचा मृत्यू झालाय. तर या आगीत अनेकजण जखमी झाल्याची घटना घडलीय. ही ट्रेन भारतीय सीमेजवळील बेनापोल शहरातून येत असल्यांची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी घटना : विशेष म्हणजे ही घटना देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी घडलीय. यावर मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) नं बहिष्कार टाकलाय. ही घटना रात्री 9 च्या सुमारास घडली. यात पश्चिम बंगालच्या सीमेला लागून असलेल्या बेनापोल या शहरातून चालणाऱ्या बेनापोल एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग लागली.

292 प्रवासी करत होते ट्रेनमधून प्रवास : या घटनेच्या वेळी ट्रेन ढाकामधील कमलापूर रेल्वे स्थानकाजवळ होती. आतापर्यंत चार मृतदेह या डब्यांतून बाहेर काढण्यात आले असून अजून मृतदेहांचा शोध सुरू आहे. या ट्रेनमध्ये सुमारे 292 प्रवासी होते. त्यापैकी बहुतेक भारतातून घरी परतत होते. ही गाडी गोपीबाग परिसरात येताच पेटवून देण्यात आल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आणखी मृतदेह अडकल्याची भीती : ढाकाच्या स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, ज्या लोकांनी हा गुन्हा केला ते प्रवासी असल्याचे भासवत होते. ढाका रेल्वे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अश्रफ हुसैन यांनी सांगितलं की, त्यांना रात्री 9 च्या सुमारास आपत्कालीन सेवा क्रमांकावरून आग लागल्याची माहिती मिळाली. पोलीस अधिकाऱ्यांना अजूनही लोक ट्रेनमध्ये अडकल्याची भाती आहे.

हेही वाचा :

  1. Ahmednagar Burning Train Fire Video : अहमदनगरमध्ये 'द बर्निंग ट्रेनचा थरार'; पाहा धगधगत्या आगीचा व्हिडिओ...
  2. Kozhikode Burning Train : कोझिकोडमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार! तीन जणांचा जळून मृत्यू
  3. Train Fire : धावत्या हमसफर एक्सप्रेसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारून जीव वाचवला, २ गंभीर
  4. BREAKING : कोल्हापूरमधील रेल्वे स्टेशनवरील रेल्वेला आग; एक डबा जळून खाक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.