मुंबई: इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नवी दिल्लीहून सॅन सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे एअर इंडियाचे विमानाचे रशियामध्ये उतवण्यात आले होते. त्यामुळे तेथील अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या निश्चित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एअर इंडियाने एका पर्यायी विमानाची व्यवस्था केली. आज प्लाइट AI173D ने पूर्व रशियामधील मॅगादान येथून सॅन फ्रान्सिस्कोसाठी उड्डाण केले. याविषयीची माहिती एअर इंडियाने दिली आहे. दरम्यान, सॅन फ्रान्सिस्कोला SFO विमान पोहोचल्यानंतर तेथील यंत्रणेने आगमनाच्या वेळी प्रवाशांची क्लिअरन्स औपचारिकता लवकर पूर्ण केली आहे. SFO टीम प्रवाशांना सर्व आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी तयार आहे. ज्यामध्ये वैद्यकीय सेवा, ग्राउंड ट्रान्सपोर्टेशनचा समावेश आहे.
विमानाने आज घेतले उड्डाण : AI173D ने रशिया (GDX) वरून सॅन फ्रान्सिस्को (SFO) साठी हवाई उड्डाण केले आहे. या विमानातून सर्व प्रवासी आणि कर्मचारी आपल्या निश्चित स्थळी जाणार आहेत. आज 08 जून 2023 रोजी (स्थानिक वेळ) 10.27 वाजता विमानाने रशिया (GDX) सोडले. हे विमान 08 जून 2023 (स्थानिक वेळ) रोजी 0015 वाजता SFO येथे पोहोचणे अपेक्षित आहे. मंगळवारी दिल्लीहून AI173 ने सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होते. परंतु विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे या विमानाला रशियातील मगदानमध्ये उतरवण्यात आले. गुरुवारी एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मगदान रशिया (GDX) मधील सर्व प्रवाशांसाठी दुसऱ्या फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामधून सर्व प्रवासी आणि क्रू यांना सॅन फ्रान्सिस्को (SFO) येथे पाठवण्यात आल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली आहे.
एअर इंडियाने प्रवाशांना पुरवली सुविधा : मगदान येथे अडकलेल्या प्रवाशांना अन्न आणि आवश्यक वस्तूची उपलब्धता कंपनीकडून केली गेली. यासाठी मंगळवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन मंगळवारी दुपारी 3.21 वाजता एअर इंडियाने बोईंग 777-200LR द्वारे फेरी फ्लाइट AI-195 चालवली. दरम्यान बदली विमान 8 जून रोजी (स्थानिक वेळेनुसार) सर्व 216 प्रवासी आणि 16 क्रूला युनायटेड स्टेट्समधील सॅन फ्रान्सिस्कोला घेऊन जात आहे. मुंबईहून एअर इंडियाचे फेरी फ्लाइट AI 195 हे सकाळी 06.14 वाजता पूर्व रशियातील मगदान विमानतळावर उतरले, असे एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा -